Tree Collapsed in Sattari  Dainik Gomantak
गोवा

सत्तरीत झाडांची पडझड; वाहतूक ठप्प, वीज खंडित

जनजीवन विस्कळीत : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

दैनिक गोमन्तक

वाळपई : अनेकवेळा वादळी वाऱ्याचा फटका बसल्यामुळे सत्तरी तालुक्यातील अनेक रस्ते बंद होण्याचा प्रकार घडला. वाळपई फोंडा दरम्यानच्या कणकिरे भागात जंगली झाड पडल्यामुळे तीन तास वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला. त्याचप्रमाणे वाळपई होंडा मार्गावरील सालेली या ठिकाणी झाड पडल्यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली.

वाळपई फोंडा दरम्यानच्या कणकिरे भागांमध्ये जंगली झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सदर झाड पडले. यामुळे कामाला जाणारे अनेक नोकर अडकून पडले होते. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागली होती. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन सदर झाड हटविले. मात्र जवळपास तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. सालेली येथे झाड पडून एक तास वाहतूक ठप्प. वाळपई होंडा मार्गावर सालेली या ठिकाणी जंगली झाड पडल्यामुळे एक तास वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला. सदर घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

कणकिरे व सालेली या ठिकाणी जंगली झाडे पडल्यामुळे वीज वाहिन्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे गुळेलीसह इतर गावातील वीज पुरवठा खंडित झाला. तसेच नगरगाव भटवाडी या ठिकाणी जंगली झाड पडल्यामुळे वीज वाहिनीचे नुकसान झाले. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT