Tree Collapsed  Canva
गोवा

Tree Collapses At Buimpal: गुलमोहराचे झाड पडून वाहतूक कोंडी; वीज वाहिनीचे नुकसान

Tree Collapsed At Goa: झाड पडले त्यावेळी कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: भुईपाल सत्तरी येथे मुख्य रस्त्यावर आज दुपारी १.३० च्या सुमारास गुलमोहराचे झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली. तसेच मुख्य वीज वाहिनीचे नुकसान होऊन काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता.

गेल्या कित्येक दिवसापासून जोरदार वारे व पावसामुळे अनेक झाडांची पडझड सुरु आहे. त्यात आज सोमवारी दुपारी रस्त्याच्या बाजूला असलेले गुलमोहराचे एका बाजूचे झाड मोडून मुख्य रस्त्यावर पडले. झाड पडले त्यावेळी कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला.

मात्र यावेळी वीज वाहिनीचे मोठे नुकसान झाले. यावेळी तातडीने वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावर झाड बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली व त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

वाळपई रेडेघाड तसेच इतर रस्त्याच्या बाजुला मोठ्या प्रमाणात धोकादायक झाडे असून कोणत्याही वेळी कोसळण्याची भीती आहे. या झाडांची पाहणी करुन धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT