Goa Latest News Dainik Gomantak
गोवा

...तर वाहतूक सचिवांनी हजर राहा! : गोवा लोकायुक्तांचा निर्देश

माहिती हक्क कायद्याखाली सुदीप ताम्हणकर यांनी फ्रोटोमाईल्स कंपनीची मागितलेली माहिती 12 जुलै 2022 पर्यंत द्यावी, अन्यथा त्या दिवशी वाहतूक सचिवांनी हजर राहण्याचा निर्देश गोवा लोकायुक्तांनी दिला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : माहिती हक्क कायद्याखाली सुदीप ताम्हणकर यांनी फ्रोटोमाईल्स कंपनीची मागितलेली माहिती 12 जुलै 2022 पर्यंत द्यावी, अन्यथा त्या दिवशी वाहतूक सचिवांनी हजर राहण्याचा निर्देश गोवा लोकायुक्तांनी दिला आहे.

सुदिप ताम्हणकर यांनी गोवा लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीत सरकार, गोवा पर्यटन विकास महामंडळ, संचालक निखील देसाई, गोवा राज्य वाहतूक प्राधिकरण, वाहतूक सचिव व फ्रोटोमाईल्स प्रा. लि. यांना प्रतिवादी केले होते.

त्यांनी फ्रोटोमाईल कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या कंपनीने वाहतूक खात्याकडे गोवा माईल्स ॲपसाठी दिलेली कागदपत्रे याची माहिती हक्क कायद्याखाली मागितली होती.

ही माहिती दिली जात नसल्याचे गोवा लोकायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते. लोकायुक्तांनी वाहतूक खात्याला ही माहिती देण्याचे निर्देश देऊन टाळाटाळ केली जात होती. वाहतूक खात्यांकडून होणारी सतावणूक तक्रारदाराने पुन्हा लोकायुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर लोकायुक्तांनी त्याची गंभीर दखल देत 23 जून 2022 रोजी आदेश देऊन ही माहिती 12 जुलैपर्यंत देण्याचे निर्देश दिले होते.

वाहतूक खात्याने ही माहिती दिली नाही तर पुढील सुनावणीच्या दिवशी वाहतूक सचिवांनी हजर राहावे असे स्पष्ट संकेत दिले आहेत. वाहतूक खात्याकडून माहिती हक्क कायद्याखाली मागितलेली माहिती जाणूनबुजून दिली जात नाही. वेळोवेळी त्याबाबत टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे तक्रारदाराला लोकायुक्तांकडे पुन्हा तक्रार करण्यास भाग पाडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT