Mauvin Gudinho Dainik Gomantak
गोवा

Mauvin Gudinho: गोव्यात अपघातात मृत्यू झाल्यास कुटूंबाला मिळणार 'इतकी' भरपाई...

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती

Akshay Nirmale

Mauvin Gudinho: गोव्यात अपघातात मृत्यू झाल्यास मृताच्या कुटूंबाला राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या भरपाईच्या रकमेच्या सर्व फायली क्लियर केल्या आहेत, अशी माहिती राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

मंत्री गुदिन्हो म्हणाले की, अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित मृताच्या कुटूंबाला भरपाई म्हणून राज्य सरकारतर्फे दोन लाख रूपये देण्यात येणार आहेत. ही योजना सध्या आमच्यासमोर असून ती अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे.

या योजनेतील सर्व फायली क्लियर केल्या आहेत. अपघातातील मृताच्या कुटूंबाला दोन लाख रूपये भरपाई दिली जाईल.

गोव्यात गेल्या काही काळात अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे.

दोन दिवसांपुर्वीच 23 जानेवारी रोजी कुंकळ्ळीमध्ये तीन वेगवेगळ्या अपघतांत एकूण चार जणांना मृत्यू झाला होता. त्यापुर्वी 18-19 जानेवारी या काळात पाच अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता.

गोव्यात असा एकही दिवस जात नाही, ज्या दिवशी अपघातात मृत्यूची बातमी वर्तमानपत्रात नसेल. गोवा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले राज्य आहे.

पण अपघातांमुळे राज्याविषयीची एक नकारात्मक प्रतिमा देशभरात जात असते. त्यामुळेच या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IPL Betting: कांदोळीत आयपीएल सट्टेबाजीचा पोलिसांकडून पर्दाफाश! गुजरातच्या 4 बुकींना रंगेहाथ पकडलं; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

US Iran Conflict: "इराणला नमतं घ्यावंच लागेल!" ट्रम्प यांचा तेहरानला निर्वाणीचा इशारा; अण्वस्त्रांचा हट्ट सोडल्याशिवाय कोणताही करार नाही

Goa IIT: गोव्याची जमीन वळवण्याचा डाव फसला? आयआयटीसाठी आता फक्त 4 लाख चौ.मी. जागा; केंद्रानं 10 लाखांचं धोरण बदललं

IPL 2026 Playoff Scenario: मुबंई इंडियन्ससाठी 'करो या मरो'ची स्थिती! एका पराभवानं 'प्लेऑफ'चं स्वप्न भंगणार; जाणून घ्या समीकरणं

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया होणार मर्यादित, मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करून रिपोर्ट पाठवणार केंद्राला; मंत्री खंवटेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT