Transfer Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाच्या सचिव लावरा ब्रिटो ई माद्रे देऊस यांची नियोजन व साख्यिकी विशेष अधिकारीपदी बदली झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्य सरकारने चार वरिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. गोवा शिक्षण विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विशांत नाईक गावणेकर यांची सहकार निबंधकपदी तर लघु बचत व सोडत खात्याचे विशेष अधिकारी संजीव देसाई यांची पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी वर्णा लावण्यात आली आहे.

इतर अधिकाऱ्यांची बदली झाली आहे त्यामध्ये सहकार निबंधक अरविंद खुटकर यांची गोवा शिक्षण विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली असून त्यांच्याकडे गोवा राज्य अनुसूचित जमात वित्त व विकास महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाच्या सचिव लावरा ब्रिटो ई माद्रे देऊस यांची नियोजन व साख्यिकी विशेष अधिकारीपदी बदली झाली आहे. माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांच्याकडे पुराभिलेख खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसांच्या आत आपापला ताबा घ्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT