Central Jail Of Goa Dainik Gomantak
गोवा

कोलवाळ कारागृहातील कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी बदली

दर सहा महिन्यांनी कारागृहातील महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची बदली केली जाईल : नारायण नावती

दैनिक गोमन्तक

म्हापसा : कोलवाळ कारागृहात गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या एका सुरक्षा रक्षकाला 1.04 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याबद्दल अटक केली होती. या पार्श्‍वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी दर सहा महिन्यांनी कारागृहातील महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची बदली केली जाईल, असे गोवा मानव संसाधन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नारायण नावती यांनी स्पष्ट केले. (Transfer of officials in Colvale jail)

शुक्रवारी नारायण नावती यांच्यासह महाव्यवस्थापक (सुरक्षा) जॉन अगियार, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी विजय गावस, व्यवहार अधिकारी नरेंद्र मयेकर यांनी कारागृहाला भेट दिली.

वरक याला पोलिस कोठडी : नावती म्हणाले की, त्या सुरक्षा रक्षकाला बडतर्फ करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. त्याला सध्या राखीव ठेवले आहे. महामंडळ योग्य पोलिस पडताळणीनंतर सुरक्षा रक्षक आणि इतर पदांवर नियुक्ती करते. कोलवाळ पोलिसांनी संशयित संदेश वरक याला म्हापसा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आम्ही कारागृहातील सर्व कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. जर हे कर्मचारी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ याच ठिकाणी तैनात असतील, तर त्यांना वाटते की ते तुरुंगातीलच कर्मचारी आहेत. म्हणून तुरुंगातील महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा आणि त्यांच्या जागी नवी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

- नारायण नावती, व्यवस्थापकीय संचालक, गोवा मानव संसाधन विकास महामंडळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT