casinos
casinos  
गोवा

GOA: कसिनोंतील व्‍यवहार पूर्ववत होणार

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी :GOA casinos सरकारने संचारबंदी शिथील केल्यावर कसिनोंवरील व्यवहार सुरू करण्यासाठी कसिनो चालकांनी पद्धतशीर पावले टाकणे सुरू केले आहे. गेल्या तीन महिन्यांत त्यांनी कसिनोंवरील सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे बंधनकारक केले आहे.(Transactions in casinos will also be undone)

कसिनोंवरील सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेतल्याने त्यांच्यापासून कोविड पसरण्याचा धोका नाही. त्यामुळे सुरक्षा नियमांचे पालन करून कसिनोंवरील व्यवहार सुरू करण्यास मुभा द्या, अशी मागणी कसिनो चालकांकडून सरकारकडे केली जाणार आहे. कसिनोंवरील बहुतांश कर्मचारी हे 44 वर्षांखालील आहेत. त्यांना केवळ खासगी इस्पितळांत जाऊनच लस घ्यावी लागते. यासाठी कसिनो चालकांकडून एका खासगी इस्पितळाकडे करार करून सामूहिक लसीकरण केले जात आहे.

कसिनोंतील व्‍यवहारही पूर्ववत

कसिनो चालकांकडून लस घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांची ने- आण करण्यासाठी असलेल्या बसमधून इस्पितळात नेण्यात येत आहे. सर्वांनी लस घेतलीच पाहिजे, असा दंडक घालण्यात आला आहे. यामुळे कोविड स्थिती सुधारू लागल्याबरोबर कसिनोंतील व्‍यवहारही पूर्ववत होणार आहेत. कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून त्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती करण्‍याचे काम सध्या जोरात सुरू आहे. कसिनोंवरील हे कर्मचारी सध्या कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेत आहेत.

‘आरबीआय’कडून व्याजदर ‘जैसे थे’

दरम्यान रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे प्रमुख व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय काल जाहीर केला. त्याचबरोबर कोविड महासाथीच्या दुसऱ्या लाटेच्या धक्क्यामुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी नव्या उपाययोजनाही घोषित केल्या. चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकासाचा वेग एक टक्क्याने मंदावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा प्रत्यक्ष एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) दर 9.5 टक्के राहण्याची शक्यता आहे आणि चलनवाढ 0.1 टक्क्याने वाढून 5.1 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि सध्याच्या ‘लॉकडाउन’च्या निर्बंधांमुळे जास्तीच्या पुरवठ्यावर येणाऱ्या मर्यादांचा अडथळा या जोखमीच्या बाबी असल्याचे सांगण्यात आले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: बार्देशात ‘सायलंट वोटिंग’चा करिष्मा! कळंगुटमध्ये अल्पसंख्याकांचे मतदान वाढले

रेजिनाल्ड, रुबर्ट यांच्या नावे सोशल मीडियावर खोटी पत्रके व्हायरल झाल्याने गोंधळ

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर; युरी आलेमाव यांचा आरोप

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

SCROLL FOR NEXT