Goa Drishti Lifeguard Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘दृष्टी’ संस्थेद्वारे जीवरक्षकांना नवीन तंत्र प्रशिक्षण

जीवरक्षकदल ‘दृष्टी’ संस्थेद्वारे जीवरक्षकांसाठी नवीन तंत्रे आणि प्राण वाचविण्याविषयी प्रशिक्षण शिबिर नुकतेच आयोजित केले होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: जीवरक्षकदल ‘दृष्टी’ संस्थेद्वारे जीवरक्षकांसाठी नवीन तंत्रे आणि प्राण वाचविण्याविषयी प्रशिक्षण शिबिर नुकतेच आयोजित केले होते. या प्रशिक्षणात शारीरिक कवायती, संवाद, समुद्रकिनाऱ्यांवरील अभ्यागत विशेषत: पर्यटकांनाही संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी माध्यमाचा वापर याविषयी मार्गदर्शन करण्‍यात आले.

(Training lifeguards in new techniques in goa)

दरवर्षी जीवरक्षकांना अशा प्रशिक्षणातून जावे लागते. प्रथमोपचार, समुद्रकिनारी ऑपरेशन, जेट स्की ऑपरेशन, रेस्क्यू ट्युबचा वापर अशा विविध बचावतंत्रांचे प्रशिक्षण दिले जाते. त्‍यात प्रथमोपचारावर अधिकतर भर देण्यात येतो. बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर त्याला जिवंत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, त्याविषयी माहिती देण्यात आली. वैद्यकीयदृष्ट्या एखाद्या व्यक्तीला मृत घोषित करण्यात तीन ते चार मिनिटांचा कालावधीत असतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील पहिली काही मिनिटे गंभीर असतात. म्हणूनच त्यावेळी उपचार होणे अपेक्षित असतात, याविषयी जीवरक्षकांना माहिती देण्यात आली.

या शिबिरात 400 मीटर पोहणे, सहनशक्ती, पोहण्याचा व्यायाम, स्ट्रोक सुधारणे, तीन ते पाच मीटर उड्या, पाण्याखाली पोहणे, मूलभूत बचाव अशा बाबी जीवरक्षकांना शिकविण्‍यात आल्‍या, असे प्रशिक्षक सांतानो फर्नांडिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT