Agreement with the American Institute

 

Twitter/Vishwajeet Rane

गोवा

अमेरिकन संस्‍थेशी करार: डॉक्टरांना नव्या उपचारांचे आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

अमेरिकेच्या ‘यूएसएआयडी’ संस्‍थेकडून अर्थसाहाय्य मिळत असलेला ‘राईस इंडिया’ हा प्रकल्प गोव्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. गोमंतकीयांकरिता विविध पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्‍यामुळे शक्‍य होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने यूएसएआयडी(USAID) या अमेरिकन संस्थेच्या आरआयएसई इंडिया प्रकल्पाअंतर्गत आरोग्यसेवांमध्‍ये सुधारणा करण्यासाठी एक वर्षाचा करार केला आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे (Vishwajeet Rane) यांनी आज या कार्यक्रमाचे रायबंदर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्‍घाटन केले.

याप्रसंगी आरोग्य खात्याच्या (Department of Health) संचालक डॉ. आयरा आल्मेदा, यूएसएआयडीचे अधिकारी अमित शहा, डॉ. विनीत श्रीवास्तव यांच्यासह इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्यमंत्री राणे म्‍हणाले की, पूर्णपणे मोफत उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधा आणि जीनोम सेकियन्सी यंत्र गोव्याला या उपक्रमातून मिळणार आहे. एका वर्षासाठी हे सर्व उपलब्ध होणार असून राज्‍यातील डॉक्टरांना अमेरिकेत नव्या उपचारांचे व नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे. त्यासोबत ऑक्सिजन व्यवस्थापन कसे करावे, याबाबतही मार्गदर्शन मिळणार आहे.

या करारानुसार नवे तंत्रज्ञान, नवे संशोधन आणि नव्या उपचारपद्धतीची देवाण-घेवाण होणार आहे. त्याचा फायदा गोमंतकीयांना उत्तमोत्तम उपचार उपलब्ध करण्यासाठी होणार असून कोरोना नियंत्रणासाठी व नव्या रोगांवर उपचारांसाठी होणार आहे. आरोग्य क्षेत्रात गोव्यातील लोकांना चांगले उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी हा करार आहे. आपले सरकार इतर संस्थांचे सहकार्य घेऊन गोव्यातील लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करत असल्याचे राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT