Boat Capsized File Photo
गोवा

Boat Capsized At Calangute: कळंगुट येथे स्पोर्ट्स बोट बुडाली; 13 पर्यटकांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू

Water Sports Boat Capsized At Calangute Goa: बोट बुडाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले व १२ जणांना वाचविण्यात यश आहे.

Pramod Yadav

Water Sports Boat Capsized At Calangute Goa

म्हापसा: कळंगुट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ पर्यटकांना घेऊन जाणारी वॉटर स्पोर्ट्स बोट कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर बुडाली. बोटीतून बेपत्ता झालेल्या सर्वांना वाचविण्यात आले पण, दुर्दैवाने यातील एकाचा मृत्यू झाला आहे. यापैकी लहानमुलासह दोघेजण गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बोट उलटल्यानंतर घटनास्थळी पर्यटक पोलिस, जीवररक्षक, कळंगुट पोलिस, पिंक फोर्स आणि वाहतूक पोलिस देखील दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले व पाण्यात पडलेल्या सर्व तेरा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पण, यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इतर, सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. एका लहान मुलासह आणखी एकजण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वॉटर स्पोर्ट्स दरम्यान, हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस घटनेचा अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT