Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News: धारबांदोडा येथील युवकाचा दुधसागर नदीत बुडून मृत्यू

Drowning Case: धारबांदोडा येथील रहिवासी कमलेश नाईक याचा मंगळवारी (८ एप्रिल) पेरीमळ काजुमळ येथील दुधसागर नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Sameer Amunekar

धारबांदोडा येथील रहिवासी कमलेश नाईक याचा मंगळवारी (८ एप्रिल) पेरीमळ काजुमळ येथील दुधसागर नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, कमलेश नदीत आंघोळीसाठी गेला असताना ही दुर्घटना घडली.

कमलेश नाईक हा पेरिमळ काजुमळ येथील दुधसागर नदीत आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. घटनेची माहिती मिळताच कुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलीसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली आणि काही वेळातच कमलेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी कुळे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

दुसरीकडे, सोमवारी (७ एप्रिल) दवर्लीत एका दोन वर्षांच्या चिमुकल्याचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मुलगा खेळताना घराशेजारी असलेल्या नाल्यात पडला. काही वेळानंतर जेव्हा तो दिसेनासा झाला, तेव्हा घरातील सदस्यांनी त्याचा शोध सुरू केला. शोध घेता घेता, मुलाचा मृतदेह नाल्यात आढळून आला. ही घटना पाहून कुटुंबीयांसह नागरीकही हादरून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT