Tiranga Rally in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Rules : तिरंगा रॅलीदरम्यान वाहतुकीच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली

चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन वाहतूक पोलीस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई यांनी दिलं आहे

आदित्य जोशी

Goa Traffic Rules : गोव्यात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला. मात्र तिरंगा रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन साजरा करताना वाहतुकीच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली झाल्याचं समोर आलं आहे. एका दुचाकीवर तिघेतिघे बसत विनाहेल्मेट रॅली गोव्यात काढण्यात आल्या. नवीन मोटर वाहन कायद्याची एप्रिल 2022 पासून गोव्यात कडक अमलबजावणी सुरु आहे. मात्र स्वातंत्र्यदिनी याच कायद्याला वाहनचालकांनी हरताळ फासल्याचं दिसून आलं आहे.

तिरंगा रॅलीमध्ये विना हेल्मेट फिरणाऱ्या दुचाकी चालकांसोबत मंत्रीही बसलेले असल्याने कारवाई कशी करायची असा प्रश्न गोवा पोलिसांसमोर उभा राहिला. गोवाकॅन या संस्थेने याविरोधात आवाज उठवत तिरंगा रॅलीमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. तसंच पोलीस आणि प्रशासनाने नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

गोव्यात सध्या रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अशाप्रकारचे नियम मोडल्यामुळे एकप्रकारे अपघातांना निमंत्रणच दिलं जात असल्याचं गोवाकॅनचं म्हणणं आहे. गोवा कॅनकडून याप्रकरणी वाहतूक पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं जाणार आहे, ज्यात वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी करण्याची मागणीही केली जाणार आहे. दरम्यान यासंदर्भात वाहतूक पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला झाल्या प्रकाराची कोणतीही माहिती नाही. मात्र याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT