Cortalim Traffic Dainik Gomantak
गोवा

Cortalim Traffic: कुठ्ठाळीत चक्का जाम कायम; वाहनचालक हैराण

दैनिक गोमन्तक

वास्को: कुठ्ठाळीत चक्का जाममुळे वाहनचालकांना तासन तास रांगेत घालावे लागत असल्याने वाहनचालकांत नाराजी पसरली आहे. तातडीने उपाययोजना आखून वाहनचालकांना होणारा त्रास दूर करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

(Traffic problems continue due to increased traffic in Cortalim)

कुठ्ठाळीत चक्काजाम हा नित्याचाच म्हटला तर वावगं ठरणार नाही. झुवारी पुलाचा एक भाग डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार असला तरी पर्यटक हंगामाला सुरु झाल्याने देशी पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यातील मुख्य रस्ते वाहनांच्या वर्दळीने व्यापले आहे. यात पर्यटकांची दोन तीन महिने गोव्यात वर्दळ आहे. त्यामुळे गोव्यात पर्यटकांचा धुमाकुळ असेल.

दरम्यान कुठ्ठाळी येथे वाढत्या वाहतूक रहदारीमुळे चक्का जाम होत आहे. येथील पुलाचे काम चालू असल्याने वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागते. मात्र वाहतूक पोलिस या गर्दीवर नियंत्रण ठेवू शकत नाही.

संध्याकाळच्या सत्रात कुठ्ठाळी जंक्शन ते दोन्ही बाजूकडील समारे दोन दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना हे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना कमीतकमी दीड ते दोनतास रांगेत उभे राहावे लागते, त्यातल्या त्यात दुचाकी चालक मिळेल त्या वाटेने, फुटपाथवरून वैगरे वाहने हाकून वाट काढताना दिसतात. यामुळे पादचा-यांना यापासून धोका निर्माण झाला आहे.

चक्काजामुळे एखाद्या रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मोकळीक नसते. त्यामुळे आपतकालीन रुग्णांचा प्राण जाण्याचीही शक्यता आहे. त्यासाठी कुठ्ठाळी भागात होणाऱ्या चक्काजामवर उपाय योजना आखावी अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

मडगाव तसेच पणजीहून पावणे सहा वाजता सुटणारे कर्मचारी कुठ्ठाळीत अडकून राहत असल्याने घरी साडेआठ ते नऊच्या दरम्यान पोचताच. त्यामुळे वाहनचालक,कर्मचारी हैराण झाले आहेत. पर्यटन हंगामा आताच सुरु झाला असून पुढचे तीन चार महिने आणखी किती त्रास वाहन चालकांना सोसावा लागेल या विचारानेच वाहन चालक त्रस्त आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: सर्वसमावेशक विचारसरणी संकुचित करण्याचा प्रयत्न! गोव्याच्या विकासाचा विचार ही काळाची गरज; डॉ. ऑस्कर रिबेलो

दूध व्यवसायाला उतरती कळा! शेतकऱ्यांची १००% अनुदानाची मागणी; आधारभूत रकमेअभावी त्रस्त

Bicholim News: डिचोली बसस्थानकासाठी मजुरांचा जीव धोक्यात! अनर्थ घडण्यापूर्वीच हा प्रकार थांबवण्याची मागणी

Cutbona Jetty: कुटबण जेट्टीवरील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक!!

Loliem Theft: लोलये देवालय चोरीतील अज्ञात सीसीटीव्हीत कैद! पोलिसांचा तपास सुरु

SCROLL FOR NEXT