Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांना पोलिस उपअधीक्षक पदी बढती

वास्को वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांना पोलिस उपअधीक्षक पदी बढती मिळाल्याबद्दल काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाने त्यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमन्तक

Vasco: वास्को वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांना पोलिस उपअधीक्षक पदी बढती मिळाल्याबद्दल काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाने त्यांचे अभिनंदन केले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर विविध पोलिस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक (Sub Inspector), निरीक्षक तसेच अधीक्षकांच्या बढत्या देऊन त्यांची वर्णी इतर ठिकाणी लावण्यात आली आहे.

त्यानुसार वास्को (Vasco) वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांना ही बढती देऊन त्यांची पोलीस उपअधीक्षक पदी वर्णी लावण्यात आली आहे. वाहतूक पोलीस निरीक्षक सुरेश नार्वेकर यांची ऑक्टोबर 2019 साली वास्को वाहतूक पोलीस निरीक्षक म्हणून वर्णी लावण्यात आली होती. आजपर्यंत त्यांनी आपल्या या कार्यकाळात चोख कामगिरी बजावून मुरगाव तालुक्यात वाहतूक नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उचलून वाहनचालकांमध्ये शिस्तीचे धडे घालून दिले होते. या कामी त्यांना वास्को वाहतूक पोलिस खात्यातील इतर पोलिसांचेही सहकार्य लाभले. त्यांच्या या सहकार्याबद्दल नार्वेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

दरम्यान नार्वेकर यांना पोलिस उपअधीक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाने वास्को पोलीस स्थानकात जाऊन अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान, दीपक सिंग, साजिद खान, एलविनो आरावजो, बर्नाडो फर्नाडीस, प्रशांत नाईक आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT