Smart City Panjim Traffic Dainik Gomantak
गोवा

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीची सुरक्षा होमगार्ड्सच्या हाती, ऐन पर्यटन हंगामात वाहतूक पोलिस गायब

Panaji Traffic: मेरशी चौकात उभारलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाहतूक यंत्रणा कित्येक महिन्यांपासून बंद आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: शहरातील वाहतूक व्यवस्था सध्या होमगार्डच्या भरोसे असल्याचे दिसत आहे. कारण वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस केवळ मोजक्याच ठिकाणी नजरेस पडत आहेत. सध्या वाहतूक कोंडीचे प्रकार वारंवार घडत असतानाच मेरशी चौकातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सिग्नल यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. त्यातच चौकातील पथदिवेही बंद पडल्याने शहराची रया गेली आहे.

एका बाजूला शहराच्या अर्ध्या भागात ‘स्मार्ट सिटी मिशन’अंतर्गत खोदकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक एका बाजूने सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांऐवजी होमगार्डच्या भरंवशावर वाहतूक व्यवस्था हाताळली जात आहे. चर्च स्क्वेअर या महत्त्वाच्या ठिकाणी किंवा सांतिनेज चौकात वाहतूक पोलिसांची गरज असताना तेथे होमगार्ड तैनात केले आहेत.

सध्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोव्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. शहरात वाहन पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आहे. दिवजा सर्कलकडे पोलिस असतानाही अधून-मधून होमगार्डना वाहतूक नियमनाचे काम करावे लागत आहे.

पथदिवे बंद; अंधाराचे साम्राज्य

मेरशी चौकात उभारलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाहतूक यंत्रणा कित्येक महिन्यांपासून बंद आहे. तेथील कॅमेरे लटकत्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पोलिसांनाच वाहतूक नियमन करावे लागत आहे. येथील मडगावकडून येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावरील पथदीप बंद आहेत. सिग्नल यंत्रणेशेजारील पथदीपही बंद असल्याने या परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे.

दुहेरी पार्किंग; वाहतूक कोंडी

शहरात पार्किंग केलेल्या वाहनांच्या मागे चारचाकी वाहने उभी करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. १८ जून मार्गावर सायंकाळी पाचनंतर नेहमीच वाहतूक कोंडी होते. चारचाकी वाहने संथगतीने हाकली जातात. मेरी इमॅक्युलेट चर्चच्या डाव्या बाजूने मळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर आयकर खात्याच्या बाजूला वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे चर्चच्या डाव्या बाजूच्या रस्त्यावर सध्या वाहतूक कोंडी पाहायला मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT