मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प Dainik Gomantak
गोवा

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

मुबंई -गोवा महामार्गावर वागदे येथे पुराचे पाणी रस्त्यावर आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण व वागदे येथे पाणी आल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. वैभववाडीतील लोरे गावात शिवगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वैभववाडी - फोंडाघाट वाहतूक बंद करण्यात आली आहे. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट गावातील उगवाई नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने, उगवाई नदीपात्रानजीक फोंडेकरवाडीत नदीचे पाणी शिरले आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शुक नदीच्या पात्रातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. चिंचवली - खारेपाटण रस्ता पाण्याखाली गेल्याने चिंचवली गावाचा संपर्कही तुटला आहे. कणकवली मधील नांदगाव परिसरात नदिचे पाणी शिरल्याने हा भाग पाण्याखाली गेल्याने नांदगाव ओटवचाही संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे. (Traffic jam on Mumbai-Goa highway)

गेल्या दोन दिवसापासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान सकाळपासून सिंधुदुर्ग परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ जाली आहे. अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले असून कुडाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने निर्मला नदीला पूर आला आहे. त्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे. वैभववाडी तालुक्यात उगवाई नदीला पूर आल्याने लोरे पुलावरून पाणी वाहत असल्याने फोंडा कडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.

सह्याद्री पट्टच्यामध्ये पाऊस जोरदार पडत असल्याने या भागातील नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मुबंई -गोवा महामार्गावर वागदे येथे पुराचे पाणी रस्त्यावर आहे. मुबई गोवा दिशेकडे जणाऱ्या दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT