Traffic jam Panjim Dainik Gomantak
गोवा

राजधानी पणजीत बसेसची गती मंदावली

‘टुगेदर फॉर पणजी’ः लोकांकडून खासगी वाहनांचा वापर

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजी शहरात चालणाऱ्या सिटी बसेस नियमित वेळेत सुटाव्यात, यासाठी वाहतूक खात्याने ठोस पाऊल उचलण्याची मागणी टुगेदर फॉर पणजी संघटनेने केली आहे.

संघटनेने वाहतूक खात्याचे मंत्री, सचिव, संचालक, पणजीचे आमदार आणि पणजीचे महापौर यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. सिटी बसेस मंद गतीने चालत असल्याने लोक त्यात जाण्याएवजी खासगी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे शहरात दाखल होणाऱ्या वाहनांच्या संख्येत भर पडते आणि याचे रूपांतर वाहतूक कोंडीत होते, असे या संघटनेचे म्हणणे आहे.

पणजी-दोनापावल, पणजी-ताळगाव, पणजी-मिरामार मार्गावर चालणाऱ्या बसेस या शहरात जास्त वेळ थांबतात, तसेच त्यांची गतीदेखील मंद असते. त्यामुळे 15 ते 20 मिनिटे लागणाऱ्या मार्गावर 45 मिनिटे वेळ जातो. या प्रकाराला कंटाळून सार्वजनिक वाहतूक वापरणारे लोक आपल्या खासगी वाहनांचा उपयोग करतात. परिणामी शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होते आणि हे वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरते.

बसेसना जीपीएस यंत्रणा बसवा

बसेस केवळ शहरात असलेल्या बस स्टॉपवर थांबतील आणि प्रवाशांना घेऊन जातील, त्या ठिकाणी ते अतिरिक्त वेळ थांबणार नाहीत, यासाठी सर्व सिटी बसेसना जीपीएस यंत्रणा बसवून त्यांना ट्रॅक केले पाहिजे. जोपर्यंत ही प्रणाली सुरू होत नाही, तोपर्यंत शिस्‍त राखून ठेवण्यासाठी वाहतूक खात्याचे अधिकारी तेथे नेमले जावेत, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

...अन्यथा माहिती अधिकाराचा वापर

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असून येथे येणाऱ्यांना चांगली सार्वजनिक वाहतूक मिळते का, याची खात्री सरकारने केली पाहिजे. या मागण्यासंदर्भात योग्य पाऊल उचलले गेले की नाही, याबद्दल माहिती हक्क कायद्यांतर्गत अर्ज केला जाईल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT