Goa Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Panaji Traffic Jam: राजधानी पणजीत पुन्हा वाहतूक कोंडी

डांबरीकरणामुळे लांबच लांब रांगा, पोलिस गायब, प्रवाशांचे हा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panaji Traffic Jam: पणजीत वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. आज संध्याकाळी बांदोडकर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामामुळे पूर्वसूचना न देता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे कदंब बसस्थानकापासून वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या.

त्यामुळे नागरिक, तसेच वाहनचालकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागला. एरवी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारे वाहतूक पोलिस आज गायब होते.

पाटो भागातही प्रचंड गैरसोय

पणजी शहरात जाणाऱ्या रस्त्यांवरील कोंडीमुळे मडगाव व फोंडा भागातून येणाऱ्या वाहनचालकांनी वाहने पुलाखालून पाटो प्लाझा भागातून मळा येथे जाणाऱ्या रस्त्याने वळविली. याच ठिकाणी आंतरराज्य खासगी बसगाड्या प्रवासी घेण्यासाठी उभ्या असतात.

या बस तेथून संध्याकाळी सुटतात. त्यामुळे आकाराने लहान असलेल्या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला आणि पाटो भागात, तसेच भाटले, सांताक्रूझकडे जाणाऱ्या रस्त्यावरही वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT