Porvorim Flyover Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover: पर्वरीतून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पुढील चार महिने वाहतुकीत मोठा बदल

Porvorim Elevated Corridor: या पुलाचे काम ०८ ऑगस्ट २०२४ पासून सुरु होणार असून, ते ०१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे.

Pramod Yadav

पर्वरी: पर्वरीत उभारण्यात येणाऱ्या एलिवेटेड कॉरिडोरचे काम येत्या दोन दिवसांत सुरु होणार आहे. उड्डाणपुलाच्या कामानिमित्त या भागातील वाहतूक वळविण्यात आलीय. पुढील चार महिन्यांसाठी पुलाचे काम सुरु राहणार असल्याने पर्वरीत राष्ट्रीय महामार्ग ६६ वर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे.

बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्यावतीने वाहतूक बदलाबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ वर पर्वरीत पाच किलोमिटर अंतराचा फ्लायओव्हर उभारला जाणार आहे. या पुलाचे काम ०८ ऑगस्ट २०२४ पासून सुरु होणार असून, ते ०१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे.

या काळात सायरस नर्सरी ते सांगोल्डा जंक्शन या १७५ मिटरच्या अंतरातील तसेच, डेल्फिनोज ते हॉटेल मॅजेस्टिक या २२० मिटर भागातातील वाहतुक वळवली जाणार आहे.

सायरस नर्सरी ते सांगोल्डा जंक्शन या १७५ मिटरच्या अंतरातील वाहतूक दोन्ही बाजुच्या सर्व्हिस रस्त्याने वळवली जाणार आहे. तर, डेल्फिनोज ते हॉटेल मॅजेस्टिक या २२० मिटर भागातातील वाहतूक डाव्या बाजुच्या सर्व्हिस रस्त्याने वळवण्यात आली आहे.

पर्वरीमार्गे उत्तर गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांनी या वाहतूक बदलाची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मार्गे बदल होणाऱ्या ठिकाणी सूचना फलक उभारले जाणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT