Stray Cattle Issue Dainik Gomantak
गोवा

Stray Cattle Issue: भटक्या गुरांचा त्रास संपेना! फोंडा-धारबांदोडा राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीला अडथळा

फोंडा तसेच धारबांदोडा तालुक्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग भटक्या गुरांनी व्यापून टाकला आहे.

Kavya Powar

Stray Cattle Issue: गोव्यातील भटक्या गुरांचा काही केल्या मार्गी लागण्याचे नाव घेत नाही. फोंडा तसेच धारबांदोडा तालुक्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग भटक्या गुरांनी व्यापून टाकला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे.

माहितीनुसार, रस्त्यावर ही गुरे ठाण मांडून बसतात. वाहन चालकांनी कितीही हॉर्न वाजवला तरी ही गुरे जागची हलत नाहीत. यामध्ये रस्त्यावर बराच वेळ वाहनांना थांबावे लागते.

यामुळे काही महिन्यांपूर्वी मोले येथे अशा बेवारस गुरांमुळे एकाचा अपघात झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाला होता.

अशा घटना वारंवार घडत असूनही सरकार याकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहत नसल्याचे मत वाहनचालकांनी आणि नागरिकांनी व्यक्त केले आहे.

फोंडा, वाळपई, सांगे, मोरजी, मडगाव अशा सर्वच ठिकाणी भटक्या गुरांची समस्या चिंतेचा विषय बनली आहे. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, ही गुरे फक्त रस्त्यावर बसून वाहतुकीला अडथळा निर्माण करत नाहीत, तर अनेकदा वाहनांवर हल्लादेखील करतात.

गुरांच्या हल्ल्यात वाहनचालक जखमी झाल्याच्या अनेक घटनाही या आधी घडल्या आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT