Golden Peacock Award at IFFI 2024 Dainik Gomantak
गोवा

IFFI Golden Peacock Award: तरुणाईचा भावनिक गोंधळ मांडणाऱ्या 'टॉक्सिक’ला इफ्फीचा सुवर्ण मयूर पुरस्कार

IFFI Goa 2024 Closing Ceremony: ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ५ परदेशी आणि २ भारतीय चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या पारितोषिकासाठी स्पर्धा रंगली होती

Akshata Chhatre

Toxic film won the Golden Peacock Award at IFFI 2024

पणजी: आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला गुरुवारी (दि. २८ नोव्हेंबर) रोजी सुरुवात झाली. चित्रपट महोत्सवाच्या या अंतिम दिवशी अनेक चित्रपटांचा, चित्रपट निर्मात्यांचा तसेच दिग्दर्शकांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे ५५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘टॉक्सिक’ या चित्रपटाला ‘सुवर्ण मयूर' बहुमान प्राप्त झाला आहे.

'टॉक्सिक' हा चित्रपट युवावस्था, मैत्री आणि आत्म-नाशाच्या काही घटकांवर प्रकाश टाकण्याचे काम करतो. या चित्रपटात निर्मात्याने तरुणपणाच्या एका महत्वाच्या आणि गडद बाजूचा शोध घेतला आहे. यामध्ये तरुणांमध्ये असलेला भावनिक गोंधळ आणि मोठे होण्याच्या दबावाचे उत्तम चित्रीकरण करण्यात आले असून या उत्तम कामगिरीसाठी चित्रपटाने समीक्षकांची प्रशंसा मिळवली.

५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ५ परदेशी आणि २ भारतीय चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या पारितोषिकासाठी स्पर्धा रंगली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT