Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

कांदोळीत कारवाईचा पुन्हा दणका; संबंधितांवर गुन्हा दाखल

याबाबत नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे यांनी माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

पणजी : नगर नियोजन खात्याच्यावतीने गेल्या महिनाभरात सुरू असलेल्या धडक मोहिमेत शुक्रवारी कांदोळी-कळंगुट येथे डोंगर कापणी, भराव टाकणे आणि बेसुमार वृक्षतोड प्रकरणी कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. (Town Planning Department taking strict action in Goa)

नगर नियोजन खात्यातर्फे राज्यात अनेक ठिकाणी नगरनियोजन खात्याच्या कायद्यांचे उल्लंघन करून परवाने न घेता मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. यासाठी डोंगरकापणी, जमिनीत भराव टाकणे, वृक्षतोड करणे, यांसारख्या बेकायदेशीर बाबींचा अवलंब केल्याचे लक्षात आल्यानंतर राज्यातील बाह्यविकास आराखडे (ओडिपी) रद्द करण्यात आले आहेत.

या आराखड्यांची तज्ज्ञ समितींमार्फत तपासणी सुरू आहे. याबरोबरच डोंगरकापणी किंवा बेकायदेशीररित्या बांधकाम उभारणी झाली असल्यास तक्रार करण्याचे आवाहन खात्यातर्फे करण्यात आले आहे. याला अनुसरून अनेक ठिकाणांहून तक्रारी येत आहेत. अशीच एक तक्रार कांदोळी हद्दीतील कळंगुट सर्वे क्र. 51/8 मध्ये डोंगर कापून बांधकाम सुरू असल्याची तक्रार आली होती. याबाबत मंत्री राणे यांनी नगरनियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, नगरनियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता, नगरनियोजन ‘कायदा 1974 कलम’ ‘17 ए’ चे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT