Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: इलेक्ट्रिक सायकल टूर्स ‘लय भारी’; पर्यटकांना भुरळ

Goa Tourism: चांगला प्रतिसाद : उच्चश्रेणीतील विदेशी पर्यटकांकडून ग्रामीण पर्यटनाला पसंती

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: गोवा पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत उत्तम पर्यटन सेवा असलेल्या इलेक्ट्रिक सायकल टूर्सला उच्चश्रेणीतील परदेशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या इलेक्ट्रिक सायकल टूर्समुळे पर्यटकांना गोव्याच्या निसर्गाचा आणि स्थानिक संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळते.​

गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ असल्याने दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. गेल्या काही वर्षांत देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढली आहे.

परंतु गोव्यात आता इतर देशांतील काही उच्चश्रेणीचे पर्यटक इलेक्ट्रिक सायकल टूर्सच्या अनोख्या अनुभवासाठी निवडत करत आहेत, जे मुख्यतः दिवाडी बेट, पणजी, जुने गोवे आणि राज्‍याच्‍या ग्रामीण भागाला पसंती देत आहेत.

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले की, इलेक्ट्रिक सायकल टूर्समध्ये बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींचा समावेश आहे. ही संकल्पना पहिल्यांदा गोव्यात नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आली.

हा उपक्रम आता उच्चश्रेणीतील पर्यटकांसाठी लाभदायक आणि आवडीचा ठरत आहे. पर्यटकांना इलेक्ट्रिक सायकली दिल्या जातात आणि त्‍यांना दिवाडी बेट, जुने गोवे हेरिटेज साईट, पणजी फोंतेन्‍हास आणि इतर अनेक ठिकाणी नेले जाते.

ग्रामीण जीवन, खाद्यपदार्थांचा आस्‍वाद

या दौऱ्यात पर्यटकांना ठिकाण, संस्कृती, परंपरा याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्‍यांना गोव्याचे ग्रामीण जीवन पाहण्याची आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. या दौऱ्याला साधारणतः दोन तास लागतात.

प्रतिव्यक्ती एक राईड १२०० रुपये आणि त्याहून अधिक आहे. पर्यटकांना या इलेक्ट्रिक सायकलींवर बॅचमध्ये फेरफटका मारला जातो. हा दौरा नवीन पर्यटन सेवेअंतर्गत येतो, ज्यात तृतीय पक्षाची नियुक्ती केली गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT