Harmal Beach  Dainik gomanatak
गोवा

हरमल येथे पर्यटकांचा धुडगूस; सूचना धाब्यावर

संध्याकाळी सहा-साडे सहानंतरही काही पर्यटक समुद्र स्नान करत असतात. अशा पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जीवरक्षकांना दिल्यास ते फायदेशीर ठरेल

दैनिक गोमन्तक

हरमल : येथील किनारी भागात सध्या पर्यटन (Tourists) हंगाम नुकताच सुरू झाला आहे. काही उद्दाम पर्यटक समुद्र (sea) स्नान करताना जीवरक्षकांच्या सूचनांना जुमानत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दुर्घटनाही (Accident) घडण्याची शक्यता आहे.

संध्याकाळी सहा-साडे सहानंतरही काही पर्यटक समुद्र (Harmal Beach) स्नान करत असतात. अशा पर्यटकांवर (Tourist) दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जीवरक्षकांना दिल्यास ते फायदेशीर ठरेल. त्यामुळे दुर्घटना घडणार नाहीत, असे मत स्थानिक नागरिक टोनी डिमेलो यांनी व्यक्त केले आहे.

शुक्रवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास एका विदेशी युवतीसह चौघीजणी खोल पाण्यात स्नानासाठी पाण्यात उतरल्या होत्या. ‘दृष्टी’ संस्थेच्या जीवरक्षकांची ड्युटी सहाच्या सुमारास संपते. मात्र, संध्याकाळी साडेसहा वाजून गेले तरीही या युवतीनी जीवरक्षकांना दाद दिली नाही. उलट बेफिकिरी दाखवत जीवरक्षकांच्या नाकीनऊ आणले.

जीवरक्षकांनी सायरनची जीपगाडी घेऊन किनाऱ्यावरून पर्यटकांना माघारी बोलावणे सुरू ठेवले. तब्बल दहा मिनिटे जीपगाडी व सायरन वाजू लागल्याने इतर पर्यटकांनी किनाऱ्यावर गर्दी केली. तेव्हा कुठे त्या तरुणी पाण्याबाहेर आल्या आणि निघून गेल्या. किनारी भागात वेळेचे बंधन पर्यटकांनी पाळणे योग्य असल्याची प्रतिक्रिया उपस्थित पर्यटकांनी व्यक्त केली.

फलकावरील सूचनांनाही हरताळ

किनाऱ्यावर सूचना पत्र लावले असूनही पर्यटक योग्य ती दखल घेत नसल्याने जीवरक्षकांनी नाराजी व्यक्त केली. शिट्टी वाजवून पाण्याबाहेर येण्याची सूचना करूनसुद्धा स्नान घेणारे उत्साही पर्यटक बेजबाबदारपणे वागतात. अशा वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे खापर मात्र जीवरक्षकांवर फोडण्यात येते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT