Tourist woman molested one arrested in anjuna goa Dainik Gomantak
गोवा

Anjuna Goa : हणजूण येथे पर्यटक महिलेचा विनयभंग, संशयिताला बेड्या

महिलेच्या तक्रारीनंतर संशयित टॅक्सी चालकास पोलिसांकडून अटक

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

Anjuna Goa : हणजूण येथे एका पर्यटक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांना संशयित टॅक्सी चालकास अटक केली. एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांच्या माहितीनुसार, काल मध्यरात्री मूळची चेन्नईची पर्यटक महिला ही दाबोळी विमानतळावर उतरली होती.

पीडित महिला त्यानंतर हणजूणपर्यंत शेअरिंग टॅक्सीत बसली. यावेळी वाटेत इतर प्रवासी हा पणजीत उतरला व ती पुढे हणजूणपर्यंत आली. मात्र, टॅक्सीतून खाली उतरत असताना, संशयित टॅक्सी चालकाने तिला पकडून तिचा विनयभंग केला. यावेळी पिडितेने संशयिताच्या तावडीतून सुटका करीत, तातडीने व्हिलामध्ये धाव घेतली आणि याबाबत तक्रार दिली.

तक्रार मिळताच, हणजूण पोलिसांनी जीए 06 टी 3258 या गाडीचा क्रमांक शोध घेत, सदर संशयित मिथुन श्रीकांत गौर (गुलबर्गा, कर्नाटक) यास अटक केली. संशयिताविरुद्ध 354 (अ) कलमान्वये गुन्हा नोंद झाला असून, तक्रार दाखल होताच दोन तासांमध्ये पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई व उपनिरीक्षक साहिल वारंग यांनी या संशयितास अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

Adam Zampa Record: कांगारुचा नवा 'किंग ऑफ स्पिन'! ॲडम झाम्पा ठरला ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 स्पिनर; शेन वॉर्नचा मोडला मोठा रेकॉर्ड

Iron Ore Mining Goa: कोडली खाणीला पर्यावरणीय मंजुरीपूर्वी मोठी सुनावणी; 377 हेक्टर क्षेत्रात 35 लाख टन लोहखनिज उत्खननाचा प्रस्ताव

Goa Politics: निंबाळकरांची 'ती' पोस्ट काही तासांत डिलीट; सरदेसाईंवरील टीकेनंतर राजकीय चर्चेला उधाण, 'गोवा फर्स्ट'वर निशाणा

SCROLL FOR NEXT