Tourist in Goa Dainik Gomantak
गोवा

सलग सुट्ट्यांमुळे गोव्यातील समुद्रकिनारे गजबजले

व्यवसाय तेजीत; राज्यात देशी पर्यटकांची वर्दळ वाढली, लाँग विकेंडचा फायदा

दैनिक गोमन्तक

पणजी : सलग चार दिवसांच्या लॉंग विकेंडमुळे देशभरातील पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळले आहेत. यात परदेशी पर्यटकांचीही भर पडल्याने गर्दीने फुललेले किनारे, वाहनाने तुडुंब भरलेले रस्ते, बुकिंग फुल्ल झालेली हॉटेल्स अशी स्थिती राज्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंदिर आणि चर्चमधील गर्दी वाढली आहे.

सध्या राज्यातील उकाडा वाढल्याने स्थानिकही किनाऱ्याचा आसरा घेत आहेत. त्यामुळे किनारे गजबजलेले दिसत आहेत. यात कळंगुट, बागा, हणजुणेसह दक्षिण गोव्यातील कोलवा, वार्का, बाणावली, पाळोळे किनाऱ्यावर गर्दी वाढलेली दिसत आहे.

कोविड महामारीच्या कारणामुळे गेल्या दोन वर्षांपासून पर्यटनावर अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता ते हळूहळू कमी होत आहेत. राज्यात नव्या कोरोनाबधितांची (Corona) संख्याही झपाट्याने कमी झाली असून म्हणून सक्रिय रुग्णांचे प्रमाणही 17 इतके कमी झाले आहे. याशिवाय राज्यात शंभर टक्के लसीकरण झाल्याने पर्यटन व्यावसायिक निर्धास्त आहेत. यामुळे या वाढत्या पर्यटनाचा फायदा हॉटेलमालक, टॅक्सीचालक, यांच्याबरोबर किनाऱ्यावरील शॅक आणि छोट्या व्यावसायिकांना होत आहे.

उन्हाळा सुरू झाल्यानंतर देशी पर्यटकांची (Tourist) पावले गोव्याकडे वळू लागतात. गेली दोन ते तीन वर्षे किनारी भागातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता. ही स्थिती आता पूर्वपदावर येत असून देशी पर्यटक गोव्यात दाखल होऊ लागले आहेत. मात्र, विदेशी पर्यटकांची संख्या रोडावल्याचे किनारी भागातील व्यावसायिकांनी सांगितले.

याविषयी अखिल गोवा शॅक्समालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ सिल्वा यांनी सांगितले, कीये यंदा प्रथमच देशी पर्यटकांची संख्या उन्हाळी सुट्टीमध्ये वाढली आहे. अनेक राज्यांतून येथे पर्यटक दाखल होत आहेत. येत्या काही दिवसांत यात आणखी भर पडणार आहे. मात्र, विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.

अन्य एका शॅक व्यावसायिकाने सांगितले, की देशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असून त्यामुळे किनारी भागातील व्यवसायाला येत्या काही दिवसांत तेजी येणार आहे. कांदोळी येथील शॅकमालक सेबी कार्दोज म्हणाले, देशी पर्यटकांची येथे वर्दळ आहे. मात्र, विदेशी पर्यटकांची संख्या केवळ 5 टक्के आहे. येथील व्यवसाय विदेशी पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यांची संख्या वाढण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.

कोलवा येथील बारमालक ख्रिस्तो फर्नांडिस म्हणाले, किनाऱ्यावर (Beach) मद्य पिण्यास बंदी असल्याने काही प्रमाणात व्यवसाय मंद झाला आहे. विदेशी पर्यटकांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र, देशी पर्यटकांमुळे व्यवसाय चालला आहे.

रेंट ए बाईक व्यावसायिक आगुस्त फर्नांडिस म्हणाले, विदेशी पर्यटकांना गोव्यातील इतर भागांत फिरण्यासाठी दुचाकीची गरज असते. मात्र, त्यांचे प्रमाण कमी असल्याने या व्यवसायावर मंदीचे सावट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT