Tourist Taxi Dispute Dainik Gomantak
गोवा

Tourist Taxi Dispute: पेडण्यातील पर्यटक टॅक्सीचालकाला बार्देशातील टॅक्सीचालकाची दमदाटी; तक्रारीनंतर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर मागितली माफी

Pernem-Bardez Taxi Driver Dispute Resolved After Apology: पेडणे तालुक्यातील पर्यटक टॅक्सीचालकास बार्देशातील टॅक्सीचालकाकडून दमदाटी करणे, पेडणेतील भाषेवरून अपशब्द वापरणे आदी कारणांवरून मंगळवारी (15 एप्रिल) सकाळी पेडण्यातील पर्यटक टॅक्सीचालकांनी हणजुण पोलिसांत धाव घेतली.

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुट: पेडणे तालुक्यातील पर्यटक टॅक्सीचालकास बार्देशातील टॅक्सीचालकाकडून दमदाटी करणे, पेडणेतील भाषेवरून अपशब्द वापरणे आदी कारणांवरून मंगळवारी (15 एप्रिल) सकाळी पेडण्यातील पर्यटक टॅक्सीचालकांनी हणजुण पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, बार्देशातील टॅक्सीचालकाने क्षमायाचनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर अपलोड केल्यानंतर पेडण्यातील टॅक्सीचालकांनी तक्रार मागे घेतली.

बार्देशातील टॅक्सीचालकाने पेडण्यातील (Pernem) टॅक्सीचालकाला दमदाटी करून अपशब्द वापरल्या प्रकरणी पेडण्यातील टॅक्सीचालका हणजूण पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हणजूण पोलिसांनी कारवाई हाती घेतली, परंतु दुपारी त्या अज्ञात टॅक्सीचालकाने क्षमायाचनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर अपलोड केला. त्यानंतर पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांनी हणजुण पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेतली व प्रकरणावर अखेर पडदा पडला.

एकमेकांत भांडू नका, दिलायला लोबो

राज्यातील पर्यटक (tourists) टॅक्सीचालकांनी छोट्या छोट्या अंतर्गत वादात पडून स्वतःचे नुकसान करून घेण्यापेक्षा एकत्रित बसून अशा घटनांवर कायमचा तोडगा काढावा अशी मागणी आमदार दिलायला लोबो यांनी त्यांच्याशी याबाबतीत विचारणा केली असता सांगितले. राज्यात यापुढे अशा घटना घडणार नाहीत या गोष्टीची सर्वांनीच काळजी घ्यावी, असे दिलायला लोबो यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New GST Rate: जीएसटी कॉन्सिलचा मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के दोनच कर; काय होणार स्वस्त? वाचा सविस्तर

Goa Politics: 'मग तुम्हीच तो DPR जनतेसमोर आणा!’ मुरगाव बंदरातील कोळसा वाहतुकीवरुन अमित पाटकरांचं सुदिन ढवळीकरांना थेट आव्हान

Viral Video: व्हायरल होण्याचा हव्यास ‘आंटींला' पडला भारी, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले,'हे रिलवाले...'

Mumbai Goa Highway: “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं…”; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर इन्फ्लुएन्सरने मांडली व्यथा VIDEO

शारदीय नवरात्रीतून मिळतायत 'हे' शुभसंकेत, देवीचे वाहन ठरवणार तुमचं भाग्य; वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT