Baga Beach Tourist Death Dainik Gomantak
गोवा

VIDEO: खडकावर बसला दारूच्‍या नशेत, अजस्त्र लाटांनी त्याला घेतले कवेत; मैत्रिणीच्‍या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नडले; बागा किनाऱ्यावरील घटना

Baga Beach Tourist Death: समुद्राच्या जोरदार लाटांमध्ये वाहून गेल्याने अश्‍‍पाक मसाली (३२, रा. विजापूर-कर्नाटक) या पर्यटकाचा मृत्‍यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: समुद्राच्या जोरदार लाटांमध्ये वाहून गेल्याने अश्‍‍पाक मसाली (३२, रा. विजापूर-कर्नाटक) या पर्यटकाचा मृत्‍यू झाला. प्रसिद्ध पर्यटनस्‍थळ असलेल्‍या बागा समुद्रावर बुधवारी दुपारी अडीचच्‍या सुमारास ही दुर्घटना घडली.

घटनेनंतर तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली. काही वेळानंतर अश्‍‍पाकचा मृतदेह पाण्‍यातून बाहेर काढण्यात आला. कळंगुट पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठविला आहे.

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये अपघाताच्या काही क्षणांपूर्वी अश्‍‍पाक खडकावर बसलेला दिसत आहे. या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

काही क्षणांत पाण्‍यात झाला गायब : अश्‍‍पाक हा समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर बसला होता. तेव्‍हा अचानक आलेल्या जोरदार लाटेने त्याला पाण्यात ओढले आणि काही क्षणांत तो वाहून गेला. त्‍यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने सांगितले की, घटनेपूर्वी अश्‍‍पाकने मद्यप्राशन केले होते. खडकांजवळ न जाण्याचा इशारा आपण त्‍याला दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 13 September 2026: बुध-चंद्राचा महासंग्राम! आज 'या' 3 राशींवर ओढवणार मोठे संकट? पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

SCROLL FOR NEXT