Dudhsagar Waterfalls Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall: पत्नीसोबत दूधसागर ट्रीप, सॉफ्टवेअर कंपनीचा मालक घनदाट जंगलात बेपत्ता कसा झाला?

Pramod Yadav

Dudhsagar Waterfall

गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असणारा प्रसिद्ध दूधसागर धबधबा जगभरातील पर्यटकांना भूरळ घालत असतो. बंगळुरुतील एक पर्यटक जोडपे गोव्यात फिरण्यासाठी आले असता त्यांना देखील दूधसागरला जाण्याचा मोह आवरता आला नाही.

चारचाकीद्वारे जोडपे दूधसागरच्या दिशेने गेले खरे पण, धबधब्याजवळील घटनदाट जंगलात 62 वर्षीय पर्यटक अचानक बेपत्ता झाला. दोन दिवसांपासून या पर्यटकाचा शोध लागलेला नाही.

अब्दुल रफीक (62) असे या पर्यटकाचे नाव असून, गुरुवारपासून कुळे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अब्दुल रफीक बंगळुरुतील एका सॉफ्टवेअर कंपनीचा मालक असून, ते पत्नीसोबत गोव्यात आले होते.

चारचाकी वाहनातून दूधसागरच्या दिशेने जात असताना दुपारी दीडच्या सुमारास त्यांचे वाहन घनदाट जंगलात थांबले. अब्दुल वाहनातून खाली उतरले आणि त्यानंतर अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या पत्नी आणि सहप्रवाशांनी तात्काळ शोध घेतला मात्र, त्यांचा शोध लागला नाही.

शोध न लागल्याने कुळे पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवली मात्र, गुरुवारी अब्दुल आढळून आले नाहीत.

अब्दुल त्यांच्या पत्नीसह वार्का येथील हॉटेलमध्ये थांबले होते. दरम्यान, त्यांनी गोव्यात पर्यटनासोबत दूधसागर धबधब्याला भेट देण्याचे नियोजन केले होते.

दरम्यान, दुसऱ्यादिवशी देखील अब्दुल यांचा शोध लागला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, घनदाट जंगलातून अब्दुल अचानक बेपत्ता कसे झाले याबाबत देखील विविध अंदाज बांधले जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT