Rain Day Enjoy Tourist  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ऐन पावसातही राजधानी पणजीत पर्यटकांचा ‘सुपर संडे’

भरपावसात शेकडो देशी पर्यटक, पणजी चर्चजवळ फोटोग्राफी, शूटिंग करताना दिसून आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजीराज्यात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. काल शनिवारी हवामान खात्याने राज्यात ‘रेड अलर्ट’ जारी करूनही आज रविवारी पणजीत देशी पर्यटकांची गर्दी दिसली. सलग सुट्ट्यांमुळे देशी पर्यटकांनी ‘सुपर संडे’चा अनुभव घेतला.

गेले दोन-तीन दिवस राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवरही रहदारी कमीच आहे. अतिपावसामुळे मासेमारी करणारे ट्रॉलर्सही मच्छीमारांनी नांगरून ठेवले आहेत.

या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी आश्चर्य म्हणजे आज पणजीत रविवारी सकाळपासून भरपावसात शेकडो देशी पर्यटक, पणजी चर्चजवळ फोटोग्राफी, शूटिंग करताना दिसून आले.

हिरा दालमिया या मुंबईहून आलेल्या पर्यटकाने सांगितले की, पावसाळ्यात गोवा अगदी हिरवागार दिसत आहे. पर्यटकांची एरवी दिसणारी गर्दी दिसत नाही. तरीही आज बऱ्या संख्येत पणजी चर्चजवळ पर्यटक दिसले, हा खरं तर मला आश्चर्यकारक अनुभव होता.​

स्वीटी गरेवाल ही उत्तराखंड इथून आलेली युवती म्हणाली, पावसाळ्यात गोवा पाहण्याची माझी इच्छा होती. गोव्यात समुद्रकिनाऱ्यांशिवाय आणखी अनेक ठिकाणी आहेत हे मी ऐकले होते. आता उद्या सोमवारी मी दक्षिण गोव्यातील काही ठिकाणांना भेट देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळवारी पालटणार 3 राशींचे नशीब; वैशाख पंचमीचा शुभ मुहूर्त ठरणार 'गोल्डन चान्स', होणार धनवर्षाव

Goa Yellow Alert: गोव्याला 23 एप्रिलसाठी 'येलो अलर्ट'; पुढील चार दिवस पावसाची शक्यता VIDEO

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

SCROLL FOR NEXT