Tourist Car Accident In Calangute  Dainik Gomantak
गोवा

Calangute Accident : सहा वेळा पलटी मारत कार दुसऱ्या कारवर आदळली! कळंगुटमध्ये भीषण अपघात, पाहा व्हिडिओ

अपघातातील गंभीर जखमींना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे

Rajat Sawant

tourist car hit to divider In Calangute : कळंगुट येथे आज सकाळी एका रेंट अ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील गंभीर जखमी चालकाला व अन्य जखमींना गोमॅकोत दाखल करण्यात आले आहे. या अपघातात रेंट अ कारने दुसऱ्या एका टॅक्सी कारला धडक दिल्याने दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंगुट येथील डॉल्फिन सर्कलजवळ एक रेंट अ कार भरधाव वेगाने जात असताना तीची धडक डिव्हायडरला बसली. या धडकेत कार सहा ते सात वेळा पलटी होवून समोरुन येणाऱ्या दुसऱ्या एका टॅक्सी कारला धडकली. या अपघातात रेंट अ कारचा चालक पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. चालकाची प्रकृती गंभीर आहे.

हा अपघात शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातातील गंभीर जखमींना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. तर दोन्ही कारच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

SCROLL FOR NEXT