South Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa: दक्षिण गोव्यातील पर्यटनाला मिळणार बूस्टर, पर्यटन मंत्री खंवटे म्हणाले मार्च महिन्यात...

मोठ्या प्रमाणावर येणारे पर्यटक प्रामुख्याने उत्तर गोव्यातील पर्यटनाला अधिक पसंती देतात.

Pramod Yadav

Goa Tourism: गोवा देशी-विदेशी पर्यटकांसाठी नेहमीच हॉट डेस्टिनेशन राहिला आहे. मौजमजा करण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक गोव्यात येत असतात. येथील शांत वातावरण आणि समुद्रकिनारा लोकांना वेगळा आनंद देऊन जातो. पण, मोठ्या प्रमाणावर येणारे पर्यटक प्रामुख्याने उत्तर गोव्यातील पर्यटनाला अधिक पसंती देतात.

दक्षिण गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण कमी असल्याने. तेथील स्थानिक व्यवसायांवर याचा परिणाम होतो. तसेच राज्यातील मोठे महोत्सव आणि कार्यक्रम देखील उत्तर गोव्यात होत असतात. अशात दक्षिण गोव्यातील पर्यटनाला बूस्टर देण्यासाठी राज्याच्या पर्यटन खात्याने दक्षिण गोव्यात मोठा महोत्सव आयोजित करणार असल्याचे म्हटले आहे.

"पर्यटन खात्यातर्फे आयोजित सर्व महोत्सव फक्त उत्तर गोव्यात आयोजित केले जाऊ शकत नाहीत. म्हणूनच खात्यातर्फे मार्च महिन्यात दक्षिण गोव्यात मोठा महोत्सव आयोजित करणार आहे. दक्षिण गोव्यातील लोकांनाही महोत्सवात सहभागी होता येणार आहे." अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.

मोरजी येथे पार पडलेला अन्न महोत्सव पणजीतून मोरजीत हालविण्यात आला. या महोत्सवात स्थानिक नागरिकांना आंतरराष्ट्रीय पर्यटकांसमोर मांडण्याची संधी मिळाली.

फोंडा येथील कार्निव्हल परेड होऊ न दिल्याने विजय सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत खंवटे यांना विचारले असता, राज्यातील चार प्रमुख शहरात कार्निव्हल आयोजित करण्यात आला, त्याच्या तारखा आणि ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे त्याबाबत वाद घालण्याची गरज नाही. असे खंवटे म्हणाले. तसेच, स्थानिक पातळीवरील कार्निव्हलची कोणी अडवणूक केली नसल्याचे खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

SCROLL FOR NEXT