Rohan Khaunte inaugurated the Dona Paula Jetty  Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Jetty : ‘सिंघम स्पॉट’ खुला; पर्यटकांना सशुल्क प्रवेश

बहुप्रतिक्षित दोना पावला जेटीचे अखेर उद्‍घाटन : नूतनीकरणासाठी लागली तब्बल चार वर्षे

दैनिक गोमन्तक डिजिटल

Dona Paula Jetty: दोना पावला येथील जेटीचे नूतनीकरण गेल्या चार वर्षांपासून सुरू होते. आता काम पूर्ण झाले; परंतु उद्‍घाटनाचा पत्ताच नव्हता. अखेर मुहूर्त ठरला पर्यटनमंत्र्यांच्या वाढदिनाचा. या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह आमदार आणि इतर नेतेमंडळी हजर राहणार, असे ठरलेले. मात्र, सकाळी 11 चा मुहूर्त टळल्यावर अनेकांनी काढता पाय घेतला.

अखेर दीड वाजता उद्‍घाटनाची औपचारिकता पार पडली. ‘सिंघम स्पॉट’ अशी ओळख असलेली ही जेटी पाहण्यासाठी शुल्क लागू केले आहे. त्यामुळे या जेटीच्या नूतनीकरणाच्या लेखी ‘विलंबच विलंब’, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. पर्यटन खात्याच्या वतीने दोनापावला जेटीचे नूतनीकरण केले आहे.

प्रौढांना 50, तर मुलांना 25 रुपये शुल्क

अखेर आज पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते जेटी सार्वजनिक करण्यात आली. नव्याने उद्‍घाटन केलेल्या जेटीवर पर्यटन विभागाने लावलेल्या बोर्डमध्ये प्रौढांसाठी 50 रुपये आणि 10 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 25 रुपये शुल्क नमूद केले आहे.

‘बॉलीवूड’ला आकर्षण

90 च्या दशकात गाजलेल्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटाने ही जेटी देशभर प्रसिद्ध केली. त्यानंतर रोहित शेट्टी यांच्या ‘सिंघम’ चित्रपटातील काही दृश्ये या जेटीवर चित्रित केली आहेत. त्यामुळे पर्यटक आवडीने हा ‘सिंघम स्पॉट’ पाहण्यासाठी येतात.

स्थानिकांना शुल्क माफ

नव्याने दुरुस्त आणि नूतनीकरण केलेल्या जेटीवर शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र, हे शुल्क फक्त पर्यटकांसाठी लागू असेल आणि स्थानिकांना प्रवेश विनामूल्य असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT