Aryan Khan Case Updates Dainik Gomantak
गोवा

Aryan Khan Case Updates: "गोव्यात ड्रग्ज घेणारी लोकं नकोत"

पर्यटकांकडून होणाऱ्या ड्रग्ज सेवनावर गोवा सरकारकडून कडक कारवाई

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा राज्याचे (Goa State) पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर (Goa Tourism minister Manohar Ajgaonkar) यांनी काल सोमवारी मुंबई NCBने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अंमली पदार्थ प्रकरणात अटक केली त्याच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, गोव्याला ड्रग्स घेणाऱ्या लोकांची गरज नाही असे वक्तव्य पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी केले.

एका सरकारी कार्यक्रमात NCB कारवाई संबंधित त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी असे मत व्यक्त केले. "पर्यटकांकडून होणाऱ्या ड्रग्जच्या सेवनावर गोवा सरकारकडून कडक कारवाई करण्यात येत असल्याचं सांगताना ड्रग्जवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी गृह खात्याची असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

23 वर्षीय आर्यन खानला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीने छापा घातला. एनसीबीच्या टीमने शनिवारी संध्याकाळी समुद्रात चालू असलेल्या रेव्ह पार्टीत सहभाग घेवून ही कारवाई केली. गोव्याकडे जात असलेल्या कॉर्डेलिया क्रूझ ही पार्टी रंगात आली होती. या क्रूझ जहाजावर अमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी एनसीबीने चौकशीसाठी आठ जणांना ताब्यात घेतले.

"गोव्यात ड्रग्ज घेणारी लोकं आम्हाला नकोत. त्याबाबतीत गोवा सरकारकडून कडक कारवाई केली जाईल", असे आजगावकर म्हणाले. ड्रग्ज सेवनाच्या उद्देशाने किंवा ड्रग्ज घेवून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कसं रोखणार, असा प्रश्न आजगावकर यांना यावेळी विचारण्यात आला होता. त्यावर "या गोष्टी माझ्या हातात नाहीत. त्या गृह खात्याच्या हातात आहेत त्यांना कसं थांबवायचं ते माझ काम नाही, मात्र गोवा राज्य ड्रग्ज आणि कचरामुक्त असावा, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

"आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा या आठ जणांची मुंबई किनारपट्टीवरील एका क्रूझवर कथित रेव्ह पार्टीच्या छाप्याशी संबंधित चौकशी केली जात आहे,

दरम्यान डीआरआयने बंदरावर छापा टाकल्यानंतर एक महिन्यानंतर ही घटना घडली आणि तिथून 21,000 कोटी रुपयांच्या किंमतीच्या 3,000 किलो वजनाचे दोन कंटेनर सापडले आणि विरोधी पक्षांनी या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa POP Ganesh Idols Restrictions: यंदाही 'पीओपी'च्‍या गणेशमूर्ती रोखणे अशक्‍य; आदेशातच अनेक पळवाटांमुळे अंमलबजावणी अशक्य

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

SCROLL FOR NEXT