maskfree Goa Dainik Gomantak
गोवा

'गोव्याला किमान 6 महिने मास्कमुक्त करु नका'

वैद्यकीय तज्ज्ञांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धसका

दैनिक गोमन्तक

पणजी : महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही मास्क हटवण्याचे संकेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. मात्र डॉक्टरांनी मास्क हटवण्याबाबत आता चिंता व्यक्त केली आहे. गोव्यात मास्क हटवण्याचा निर्णय फारच घाईचा असल्याचं मतही काही डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

देशात सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडल्याने पुन्हा एकदा धास्ती वाढली आहे. त्यातच मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोवा लवकरच मास्कमुक्त करण्याचे संकेत दिले होते. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्यासाठी धोकादायक ठरु शकतो असं काही डॉक्टरांचं म्हणणं आहे. मास्क हटवण्याचा निर्णय सरकारने विचारपूर्वक घेण्याची मागणीही आता होताना दिसत आहे.

गोव्यात सध्या पर्यटकांची (Tourist) गर्दी वाढलेली आहे. देशविदेशातून पर्यटक सुट्टीसाठी गोव्यात दाखल झाले आहेत. तिसरी लाट ओसरल्यानंतर आलेली शिथिलता आणि त्यामुळे पर्यटकांमध्ये झालेली लक्षणीय वाढ यामुळे गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू शकतो. गोव्यात प्रवेशासाठी असलेले निर्बंधही (Restrictions) आता शिथिल करण्यात आले आहेत. कोरोना टेस्टचं प्रमाणही तुलनेने कमी झालेलं आहे. अशात मास्कची सक्तीही हटवल्यास राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी किमान पुढील 6 महिने मास्कची सक्ती राज्यात लागू करण्याची मागणीही केली जात आहे.

यापूर्वी ब्रिटिश एअरवेजने मास्कची सक्ती हटवली होती. तसंच मास्क न वापरता विमानसेवा सुरु ठेवली होती. मात्र सद्यस्थितीत एअरलाईनच्या केबिन क्रू आणि कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याने त्याचा विमानसेवेवर परिणाम झाल्याचं चित्र आहे. याचाच दाखला देत गोव्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी मास्कची सक्ती आणखी 6 महिन्यांपर्यंत ठेवण्याची शिफारस केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT