Tomato Price Hike Dainik Gomantak
गोवा

Tomato Price Hike : पावसामुळे टोमॅटोचे भाव चढेच; सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्‍लिक

चंद्रहास देसाई : आठवड्याभरात दरात होणार घट

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : राज्यासहित देशभरात टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्‍लिक झाले असून तुटपुंज्या पगारात संसाराचा गाढा चालवायचा कसा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

केवळ टॉमेटोच नव्हे तर हिरवी मिरची, आले, पालेभाज्यांसहित सर्वांच्याच दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान,आठवड्याभरात टोमॅटोचे दर घसरतील, असे गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई यांनी सांगितले.

गोवा सरकारद्वारे वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू नये. नागरिकांना वाजवी दरात भाजीपाला मिळावा यासाठी गोवा फलोत्पादन महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्याद्वारे बाजारापेक्षा कमी दरात नागरिकांना भाजीपाला मिळावा हा यामागचा उद्देश आहे. तसेच बाजारभावापेक्षा कमी दरात भाज्या उपलब्ध होतात. परंतु काही दिवसांपासून फलोत्पादन केंद्रात कांदा ,बटाटा वगळता इतर भाजी दरात वाढ होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने त्याचा प्रभाव टॉमेटो उत्पादनावर झाला. टॉमेटोची साल ही अतिशय नाजूक आणि पातळ असते. तिला पाणी लागल्यास मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे नुकसान होते. पावसामुळे टोमॅटो तसेच इतर भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. तसेच मालाची ने-आण करणे कठीण होत असल्याने दरात वाढ झाली आहे. पाऊस ओसरल्याने भाज्यांच्या दरात घट होईल.

-चंद्रहास देसाई, गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT