Bhagwant Mann Dainik Gomantak
गोवा

'ED ला सांगितले काही मिळाले तर 50-50 वाटून घेऊ' पंजाबचे CM भगवंत मान यांचे गोव्यातील विधान चर्चेत

अटकेची किंवा अंमलबजावणी संचालनालयाचे समन्स पाठवून ते आम्हाला धमकावले जात आहे - भगवंत मान

Pramod Yadav

Bhagwant Mann: भाजप सरकार अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) छापे टाकण्यासह आम आदमी पार्टीच्या (आप) नेत्यांना अटक करण्याची धमकी देत आहेत, असे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी (दि.19) गोव्यात केले.

बाणावली येथील एका कार्यक्रमात मान बोलत होते. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर व इतर नेते उपस्थित होते.

कामाचे राजकारण कसे करायचे हे आम्हाला माहीत आहे. अटकेची किंवा अंमलबजावणी संचालनालयाचे समन्स पाठवून ते आम्हाला धमकावले जात आहे.

आमच्या नेत्यांविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत असे ईडीचे अधिकारीही आम्हाला सांगतात, पण त्यांना छापे टाकण्यास भाग पाडले जाते… हा बॉसचा आदेश आहे, असे ते म्हणतात.

आमच्या घरातून तुम्हाला काहीही मिळाले तर घेऊन जा, 50-50 वाटून घेऊ, असे मी त्यांना सांगितले आहे.

केजरीवाल यांनी दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी गुरुवारी ईडीने जारी केलेले चौथे समन्स टाळत चौकशीला दांडी मारली.

देशात एकच माणूस आहे जो मोदींसमोर उभा राहू शकतो आणि तुम्हाला पाहिजे ते करा असे म्हणू शकतो, त्यांचे नाव केजरीवाल, असे मान म्हणाले.

मी शाळा, रुग्णालये, मोफत वीज आणि पाणी देईन. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आमच्या मंत्र्यांना तुरुंगात टाकू शकता... मला ईडीच्या नोटीस पाठवू शकता. पण, मी केजरीवाल कामाचे राजकारण करत राहीन, असे मान म्हणाले.

दरम्यान, आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहे. गोव्यातील लोकसभा निवडणूक जागा वाटपाबाबत आमच्या आघाडीसोबत चर्चा सुरु आहेत. याबाबत निर्णय झाल्यानंतर आम्ही पुन्हा येऊ, निर्णय काहीही असो पण येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT