Todays special event in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील आजचे खास कार्यक्रम

एका क्लिक वर जाणून घ्या आपल्या गोव्यातील आजचे कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रमोद सावंत सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. (Todays special event in Goa)

पणजी : ऑर्थोटिक्स प्रोस्थेटिक्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे २६ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन. स्थळ : पणजी कन्व्हेंशन सेंटर.

म्हापसा : गोपाळकृष्ण देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त कला चेतना वळवईतर्फे ‘भिवपाची गरज ना’ कोकणी नाटक. वेळ : रात्री ८.३० वा. स्थळ : ओळावली-पोंबुर्फा.

जांबावली : मठग्रामस्थ हिंदू सभेच्या उत्सव मंडळातर्फे शिशिरोत्सवानिमित्त ३५ कलाकारांच्या संचातर्फे ‘लावण्यतारका’ हा लावणीचा कार्यक्रम. वेळ : रात्री १० वा. स्थळ : जांबावली.

डिचोली : अवधूत मंदिरातील श्रीदत्त व परिवार देवतांची मूर्तिप्रतिष्ठापना तसेच नूतन शिखर कलश स्थापना. वेळ : स. ८ पासून. स्थळ : नार्वे-डिचोली.

केपे : चंद्रेश्‍वर भूतनाथ देवस्थानात पर्वतावरील हळदुणेचे आगमन. हळदुणे कट्टा-आमोणा येथील देवालयात पोचल्यानंतर आरत्या, अवसर व तीथ्रप्रसाद. वेळ : सायं. ७ वा. स्थळ : चंद्रेश्‍वर भूतनाथ देवस्थान, पर्वत पारोडा.

मांद्रे : दाडोबा देवस्थानात शिमगोत्सवानिमित्त दाडोबा तरुण हौशी नाट्यमंडळ आस्कावाडा-मळी, मांद्रेतर्फे ‘सं. मत्स्यगंधा’ नाटकाचा प्रयोग. वेळ : रात्री. ९.४५ वा. स्थळ : आस्कावाडा.

तांबडीसुर्ला : सातेरी देवालयाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त गौरीतनया कला संघ घोणशी-नागेशी निर्मित व तुळशीदास घोणशीकर प्रस्तुत ‘जावय शेणलो मावोड्या’ या कोकणी नाटकाचा प्रयोग. वेळ : रात्री ११ वा. स्थळ : आगलोत-साकोर्डा.

म्हापसा : चौरंगीनाथ भूमिका देवस्थानात साप्ताहिक सोमवार. यानिमित्त पंचायतन देवतांची नित्यपूजा. स्थळ : हडफडे-सीमवाडा.

शिवोली : सिद्धेश्‍वर देवस्थानात शिशिरोत्सवानिमित्त दाभोलवाडेकरांतर्फे ‘अखंड नाते रक्ताचे’ सामाजिक नाटक. वेळ : रात्री १० वा. स्थळ : कायसूव.

म्हापसा : सातेरी पंचायत देवस्थानच्या पालखी उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम. वेळ स. ८ पासून. स्थळ : पोडवाळ-खोर्जुवे.

मडगाव : जांबावलीच्या शिशिरोत्सवानिमित्त ७ ते १४ वयोगटातील मुलांसाठी फॅन्सी व रेकॉर्ड डान्स स्पर्धा. वेळ : सायं. ६ वा. स्थळ : जांबावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT