Marathi breaking news Dainik Gomantak
गोवा

Goa News: श्री माऊली देवीचा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

Akshata Chhatre

Goa Culture: श्री माऊली देवीचा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

उगवे येथील श्री माऊली देवीचा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, पहाटे पाच वाजता धार्मिक विधीला सुरुवात करण्यात आली.

Goa Crime News: राय खून प्रकरणात दोघांना अटक

राय येथे भाड्याच्या खोलीत एका मजुराच्या हत्येप्रकरणी मायना-कुडतरी पोलिसांनी फरार आरोपी शशिबंत बिभीसन माझी (३४, रा. राया, न. ओडिशा) आणि रबी माझी (२८, रा. राया, न. ओडिशा) यांना अटक केली.

Goa Fire News: सांगे येथील नागवे टेकडीवर भीषण आग

Rajdeep Naik Goa: मंत्री गावडे त्यांच्याच जगात आहेत; मुख्यमंत्री आणि भाजप गोवा अध्यक्ष दामू नाईक यांनी हस्तक्षेप करावा

कला अकादमीची स्थिती चांगली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मंत्री गोविंद गावडे हे त्यांच्याच जगात आहेत आणि त्यांना कला अकादमीची पर्वा नाही. मुख्यमंत्री आणि भाजप गोवा अध्यक्ष दामू नाईक यांनी हस्तक्षेप करावा: अभिनेता राजदीप नाईक

Ambedkar Jayanti 2025: पर्वरीत आंबेडकर भवनासाठी 2,140 मीटर जमीन सरकारकडून सुपूर्द; 10 कोटींची तरतूद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी पर्वरी येथील 2,140 मीटर जमीन सरकारकडून सुपूर्द करण्यात आली. भवनासाठी 10 कोटींचा निधीही मंजूरही करण्यात आला. पुढील सहा महिन्यात आंबेडकर भवनाची पायाभरणी करणार, असे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Valpoi News: जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात ८ ते १० रानटी गव्या रेड्यांचा कळप

वाळपई येथील उत्तर गोवा विभागाचे केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयाच्या जवळच परिसरात रस्यांवरच सध्या ८ ते १० रानटी गव्या रेड्यांचा कळप. विद्यालयाच्या कुंपणाचे दुरुस्ती काम करावे अशी मागणी.

Pramod Sawant: कला अकादमी प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी पत्रकारांनी केला बोलण्याचा प्रयत्न...

Ambedkar Jayanti 2025: बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी

कुडचडे येथील आंबेडकर सर्कल येथे डॉ.भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, नरेंद्र सवाईकर व सर्वानंद भगत, कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोजकुमार नाईक आदी उपस्थित होते.

Fire Brigade Goa: अग्नीशमन दलासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

सर्व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगामी आर्थिक वर्षापासून मिळणार आग जोखीम भत्ता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा.

LOP Yuri Alemao: तांत्रिक अडचणींमुळे मराठी नाटक 'पुरुष' चा प्रयोग थांबला; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्याकडून घटनेचा निषेध

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या घटनेचा निषेध केला आहे. कला अकादमीतील वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे मराठी नाटक 'पुरुष' चा प्रयोग थांबवावा लागला. अकादमीच्या नूतनीकरणानंतरही सदोष पायाभूत सुविधा आणि त्रुटी कायम राहिल्याने गोव्यातील कलाकारांनी अनेकदा आपली चिंता व्यक्त केली आहे, पण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कला आणि नाट्यभूमी असलेल्या गोव्यासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सरकार असं वागून कला अकादमीचे 'मृत्युपत्र' लिहित आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Ambedkar Jayanti Goa: महामानवाला अभिवादन..!

डिचोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणा. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे आवाहन.

Kala Academy Goa: "शरद पोंक्षेंना दुर्लक्षित करणार का?"

कला अकादमीतील घोटाळा आणि मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी कला अकादमीच्या गैरव्यवस्थापनाचा पर्दाफाश केल्याबद्दल आपण सरकारकडून कारवाई करण्याची अपेक्षा करू शकतो का? की गोव्यातील नाट्य कलाकार आणि कार्यकर्त्यांनी वारंवार केलेल्या अशा प्रकारच्या निरीक्षणांप्रमाणे शरद पोंक्षे यांचे निरीक्षण दुर्लक्षित केले जाईल? : विजय सरदेसाई

Goa News: "मालीम जेट्टी योजनेबद्दल मला माहिती नव्हती" रोहन खवंटे

"मला मालीम जेट्टी योजनेबद्दल माहिती नव्हती. मी पंचायतीकडे चौकशी केली आणि त्यांनी पुष्टी केली की कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. मी मंत्रिमंडळात मंत्री आहे तसेच स्थानिक आमदार आहे, तरीही मला वर्तमानपत्रांमधून याबद्दल माहिती घ्यावी लागली. स्पष्टपणे, पडद्यामागे कोणीतरी खेळत आहे": मंत्री रोहन खवंटे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT