Colvale jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी! कॉन्स्टेबलचा सहभाग; प्रकरण दडपल्याची चर्चा

Colvale Jail Tobacco Smuggling: कारागृहाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मध्यस्थीमुळे कारवाईऐवजी हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा कारागृहातीलच तुरुंगरक्षकांमध्ये सुरू आहे.

Sameer Panditrao

पणजी: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अमलीपदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थाची तस्करीचे प्रकार सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या ड्यूटीवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला कारागृहाच्या प्रवेशद्वारावर तपासणीवेळी ६ तंबाखूच्या पाकिटांसह ताब्यात घेण्यात आले होते.

मात्र कारागृहाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मध्यस्थीमुळे कारवाईऐवजी हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा कारागृहातीलच तुरुंगरक्षकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे कारागृहातील या तंबाखूच्या तस्करीप्रकरणात अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची माहिती सूत्राने दिली.

यापूर्वी कारागृहातील ड्रग्ज तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तत्कालीन माजी पोलिस महानिरीक्षक ओमविर सिंग बिष्णोई यांनी कारवाई केली होती. पोलिस कॉन्स्टेबल नवदीप पावणे तेच तुरुंग अधिकारी कृष्णा उसगावकर यांना निलंबित करण्यात आले होते.

अधिकाऱ्याची मनमानी

गेल्या महिन्यात या कारागृहाच्या एका तुरुंग अधिकाऱ्याने तर काही महिला कर्मचाऱ्यांना व जन्मठेप झालेल्या एका महिला कैद्याला हाताशी धरून मनमानी सुरू केली आहे. त्यांच्यासाठी त्याने सहलही एका गेस्ट हाऊसमध्ये आयोजित केल्याची चर्चा तुरुंग रक्षकांमध्ये आहे. गेले काही महिने ड्रग्ज व तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीवर निर्बंध आले होते, मात्र आता पुन्हा हे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. काही अधिकाऱ्यांचाच विशिष्ट पोलिस कॉन्‍स्टेबल्स व तुरुंग रक्षकांना आशीर्वाद असल्याने असे प्रकार घडतात, असे सांगण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT