MLA Dayanand Sopte Dainik Gomantak
गोवा

पाण्याची समस्या सोडवण्यासाठी तुयेत लवकरच प्रकल्प उभारणार: आमदार सोपटे

तुये येथे 1 कोटी 65 लाख रुपये खर्च करून नवीन पाण्याची टाकी उभारण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

दैनिक गोमन्तक

मांद्रे मतदार संघातील (Mandre Constituency) पाण्याची समस्या पूर्णपणे सोडवण्यासाठी तुये येथे लवकरच 65 कोटी रुपये खर्च करून 30 एम एल डी पाणी प्रकल्प लवकरच उभारून ही समस्या सोडवली जाईल असे मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी तुये येथे 1 कोटी 65 लाख रुपये खर्च करून नवीन पाण्याची टाकी उभारण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. 7 रोजी गावकर वाडा तुये (Tuye) येथे नवीन पाण्याच्या टाकी बांधकाम शुभारंभ कार्यक्रमात तुये सरपंच सुहास नाईक, पंच कविता हरिजन, पंच आणि माजी सरपंच किशोर नाईक, भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, पाणी विभाग अभियंते संदीप मोरजकर, गौरेश ठाकूर व नागरिक उपस्थित होते.

गावकरवाडा तुये येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या वारंवार उद्भभवत होती. अनेकवेळा नागरिकांनी या समस्य्कडे आमदार दयानंद सोपटे यांचे लक्ष वेधले होते. आमदार दयानंद सोपटे यांनी यांची दाखल घेवून नवीन 300 क्युबिक लिटरची नवीन टाकी या भागात उभारून हि समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना मान्द्रेच्या विकासासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सर्व मंत्री खात्याचे अधिकारी यांचे सहकार्य मिळत असल्याने विकास कामे चालू असल्याचे सांगितले. पाण्याची समस्या सर्वत्र आहे, चंदेल पाणी प्रकल्पातून येणारे पाणी सर्वाना व्यवस्थित मिळत नाही, याची जाणीव ठेवून आता मांद्रे मतदार संघासाठी खास नवीन 30 एम एल डी पाणी प्रकल्प उभारला जाणार आहे, त्याला मंजुरी मिळाल्याने समाधान व्यक्त केले. नागरिकांनी आणि पंचायत मंडळाने सहकार्य करून आपापल्या प्रभागाची विकास कामे करून घेण्याचे आवाहन केले.

तुये सरपंच सुहास नाईक यांनी बोलताना नवीन पाणी प्रकल्प उभारल्यानंतर पाण्याची समस्या सुटणार आहे, सध्या टाकी बांधून गैर सोय दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे . आमदार दयानंद सोपटे यांच्या सहकार्यातून विकास कामाना प्राधान्य मिळत आहे, पर्यटन महामंडळ निधितूनही विकास कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सरपंच किशोर नाईक यांनी बोलताना या वाड्यावर पाण्याची समस्या गंभीर होती या विषयी आमदार सोपटे आणि पाणी विभागाचे अधिकारी याना वर्न्वाल कळवले जायचे, आता टाकी उभारल्यानंतर पाण्याची समस्या सुटणार असा विश्वास व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT