Aleixo Sequeira Goemkarponn
गोवा

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी खाजन जमीन खरेदी करावीच लागेल; मंत्री आलेक्स सिक्वेरा

Aleixo Sequeira: नव्या बोरी पुलाच्या बांधकामात एकाही घराला धोका पोहोचणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: नवीन बोरी पुलाची उभारणी ही स्टील्टवर केली जाणार आहे. मात्र, या पुलाच्या उभारणीसंदर्भात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. ४ लाख चौरस मीटर जागा संपादित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते; पण प्रत्यक्षात या पुलासाठी लोटलीतील जास्तीत जास्त ९० हजार चौरस मीटर जमीन संपादित केली आहे. तसेच त्यासाठी खाजन जमीनही संपादित करावी लागेल, असे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.

नव्या बोरी पुलाच्या उभारणीबाबत मंत्री सिक्वेरा म्हणाले की, नव्या बोरी पुलाच्या बांधकामात एकाही घराला धोका पोहोचणार नाही. मात्र, पुलासाठी निश्चित केलेल्या कोणत्याही मार्गाचा पर्याय निवडल्यास कोणाची ना कुणाची खाजन जमीन संपादित करावी लागणारच आहे. नवा पूल नको, असे कुणीही म्हटलेले नाही, ही समाधानाची बाब आहे.

लोटलीतील शेतकऱ्ंयाची पणजी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. स्टील्टवर पुलाची उभारणी करण्यात येणार असल्याने पाण्याच्या प्रवाहाला कोणताही अडथळा निर्माण होणार नसल्याचे मत मंत्री सिक्वेरा यांनी मांडले.

आलेक्स सिक्वेरा, पर्यावरण मंत्री

कारवारमधील घटनेप्रमाणे कोणतीही घटना घडू नये यासाठी वेळेआधीच जुन्या पुलावरील वाहतूक नव्या पुलावरून सुरू करण्याची गरज आहे. बोरी पुलावर उभे राहिल्यास वाहने गेल्यावर पुलाला बसणारी कंपने जाणवतात. त्यामुळे राज्य सरकारने कोणतीही अनुचित घटना घडण्याआधी नव्या पुलाच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT