TMC National Vice President Luizinho Faleiro Dainik Gomantak
गोवा

लुईझिनऐवजी फातोर्ड्यात तृणमूलकडून सेओला वाझ रिंगणात

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तृणमूलकडून उमेदवारी जाहीर

दैनिक गोमन्तक

पणजी : तृणमूल काँग्रेसने फातोर्डा मतदारसंघातून सेओला वाझ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो यांचं नाव घोषित करण्यात आलं होतं. मात्र पक्षाच्या या निर्णयावर लुईझिन फालेरो यांनी नाराजी व्यक्त केली होती. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्याला विचारात घेतलं नसल्याने त्यांनी नाराजी उघड केली होती. (Luizinho Faleiro Latest News Updates)

दरम्यान तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेऊन वाझ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाने फातोर्डा (Fatorda) मतदारसंघातून लुईझिन फालेरो यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र ते विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. त्यामुळे पक्षाने फालेरो यांच्याजागी तरुण आणि पेशाने वकील असलेल्या सेओला वाझ यांना उमेदवारी जाहीर केल्याचं तृणमूल काँग्रेसच्या (TMC) पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे.

सेओला वाझ या फातोर्डा मतदारसंघातीलच रहिवासी असून गेल्या काही काळापासून तृणमूल काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. लुईझिन फालेरोंऐवजी आता फातोर्ड्यात विजय सरदेसाई (Vijay Sardesai) आणि दामू नाईक यांच्यासोबत सेओला वाझ निवडणुकीच्या रिंगणात असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT