Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Goa News : तिसवाडीत भाजपपुढे विरोधकांचे कडवे आव्हान

Goa News : अल्‍पसंख्‍यांक, परप्रांतीय मतदारांची संख्‍या मोठी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

तिसवाडी, लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असून राजकीय वातावरण बरेच तापले आहे. तिसवाडी तालुका हा भौगोलिक आणि राजकीयदृष्‍ट्या महत्त्वाचा आहे.

कारण येथे राजधानी पणजीसह इतर चार मतदारसंघ आहेत. यंदाच्या निवडणुकीत तिसवाडीत भाजपला कडवे आव्हान मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे.

२०२२च्‍या विधानसभा निवडणुकीत राजधानी पणजीत बाबूश मोन्सेरात आणि उत्पल पर्रीकर यांच्यात थेट लढत झाली होती. त्यात मोन्सेरात अवघ्या ७०२ मतांनी विजयी झाले. उत्पल हे अजूनही भाजपच्या जवळ असल्याने लोकसभा निवडणुकीत ते भाजपसोबत असतील असा अंदाज आहे. परंतु इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीवासीयांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. खास करून मोन्सेरात यांनी केलेल्या विधानावरुन लोक संतप्‍त आहेत. त्‍याचा फटका भाजपला बसू शकतो.

ताळगाव मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांचे २००२ पासून साम्राज्‍य आहे. परंतु २०२२च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आप’नेही मोन्सेरात यांना चांगली टक्कर दिली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष ‘इंडिया’ गट म्हणून एकत्र आल्याने भाजपसाठी लोकसभा निवडणूक सोपी असणार नाही, हे निश्‍चित. त्यातच स्थानिक आमदार जेनिफर मोन्सेरात या निष्क्रिय असल्याची टीका लोकांकडून सातत्याने केली जातेय. साहजिकच भाजपला कंबर कसावी लागणार यात शंका नाही.

सांताक्रुझ, सांतआंद्रे आणि कुंभारजुवा मतदारसंघात २०२२च्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आरजी’ने यश प्राप्‍त केले होते. परंतु नंतर पक्षांतरामुळे सांताक्रुझचे आमदार रुडॉल्‍फ फर्नांडिस आणि कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला.

पण या मतदारसंघातील मतदार भाजपला मतदान करणार, असा त्‍याचा अर्थ होत नाही. सांताक्रुझ आणि सांतआंद्रे हे काँग्रेस पक्षाचे बालेकिल्ले. तर, कुंभारजुवा मतदारसंघात अल्पसंख्यांक मतदार मोठ्या संख्‍येने असल्याने भाजपसाठी वाट कठीण आहे. सांताक्रुझमध्ये आमदार रुडॉल्फ फर्नांडिस जास्‍त सक्रिय नाहीत. तर, कुंभारजुवेत राजेश फळदेसाई सक्रिय असले तरी पक्षांतर केल्याचा राग अजूनही मतदारांच्‍या मनात कायम आहे.

कोणत्‍याही निवडणुकीच्‍या दृष्‍टीने तिसवाडी तालुका हा महत्त्‍वाचा आहे. या तालुक्‍यातील मतदारसंघांमध्‍ये अल्पसंख्याक आणि परप्रांतीय मतदार मोठ्या संख्‍येने आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे स्टार प्रचारक असून, ते देशातीलच नव्हे तर जगातील लोकप्रिय नेते आहेत.

- गिरीश उस्‍कैकर, जिल्हा पंचायत सदस्य (सांताक्रुझ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Auction 2025: मास्टर ब्लास्टरच्या लेकाला मिळाला खरेदीदार! शेवटच्या क्षणी MI ने खेळला मोठा डाव

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

SCROLL FOR NEXT