Mormugao municipal Dainik Gomantak
गोवा

'मुरगाव नगरपालिका कामगारांवर भाजपमुळे उपासमारीची वेळ'

राज्यात काँग्रेस सरकार आल्यास राज्यातील सर्व पालिका मंडळांना आगाऊ वेतन दिले जाईल; कॉंग्रेस नेते

दैनिक गोमन्तक

मुरगाव नगरपालिका कामगारांना वेतनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून सतावत असून याला पूर्णपणे जबाबदार सत्ताधारी भाजप पालिका मंडळ असल्याची तीव्र प्रतिक्रिया गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी दिली. मुरगाव नगरपालिका कामगारांना जानेवारी 2022 महिन्याचे वेतन अजूनही मिळाले नसल्याने कामगार व त्यांच्या कुंटूबियांवर आर्थिक संकटा बरोबर उपासमारीची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) सत्ताधारी भाजप फक्त आश्वासने देतात. प्रत्यक्षात मात्र जनतेला आर्थिक संकटात टाकत आहेत.

गोव्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास मुरगाव (Mormugao) नगरपालिके बरोबर राज्यातील इतर पालिका कामगारांना वेतनाविना काँग्रेस सरकार कधीच ठेवणार नसून त्यांना आगाऊ वेतन दिले जाईल अशी माहिती नजीर खान यांनी दिली. वास्को बायणा येथील गोवा काँग्रेस (Congress) अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती अध्यक्ष नजीर खान यांनी दिली.

यावेळी त्यांच्या समवेत वास्को कॉंग्रेस प्रभारी तथा ओरिसा काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष महंमद जिया उल हक, साजिद खान, एलविनो अरावओ पस्थित होते. पुढे बोलताना नजीर खान म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून मुरगाव पालिकेत भाजपा नगरसेवक सत्तेवर असून सुद्धा कामगारांना वेळेवर वेतन देऊ शकत नाही. याला पूर्णपणे जबाबदार सत्ताधारी भाजप नगरसेवक असल्याचा आरोप खान यांनी केला.

सत्ताधारी भाजपचे (BJP) नगरसेविका शमी साळकर वास्को (Vasco) बायणा इस्लामपूर भागात प्रचार करून येथील युवकांना नोकर्‍या देणार असे आश्वासन देत असून, सर्वप्रथम शमी साळकर यांनी पालिकेच्या कामगारांना वेतन देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन खान यांनी केले. नगरसेवक दीपक नाईक यांनी पालिकेत असताना फक्त स्वतःचा विकास केला.

परंतू आपल्या प्रभागाचा विकास करण्यास सपशेल अपयशी ठरला असल्याचा आरोप नजीर खान यांनी केला. दीपक नाईक नगराध्यक्षपदी असताना पालिका कामगारांना वेतनाचा प्रश्न भेडसावत आहे, तो अजूनपर्यंतही आहे. परंतु राज्यात काँग्रेस सरकार आल्यास राज्यातील सर्व पालिका मंडळांना आगाऊ वेतन दिले जाईल असे आश्वासन शेवटी नजीर खान यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT