Tillari Dam Dainik Gomantak
गोवा

Tillari Dam: जिलेटिन स्फोटांमुळे ‘तिळारी’ धरणाला धोका! घरांच्या भिंतींनाही तडे, ग्रामस्थांचा दावा

Illegal Mining Near Tillari Dams: महाराष्ट्र आणि गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेले ''तिळारी'' धरणाचे अस्तित्व सध्या संकटात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tillari Dam Under Threat Due to Illegal Blasting in Quarrying Zone

डिचोली: महाराष्ट्र आणि गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेले ''तिळारी'' धरणाचे अस्तित्व सध्या संकटात आले आहे. धरण क्षेत्रातील खानयाळे-शिरंगे परिसरात गौण खाणी (काळा दगड) उत्खननासाठी अंदाधुंद करण्यात येत असलेल्या जिलेटिन स्फोटांमुळे धरणाला धोका पोहचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या विरोधात खानयाळे गावातील नागरिकांनी आवाज उठवला असून आंदोलनाचे अस्त्र हाती घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून साखळी उपोषण चालवले आहे. दरम्यान, डिचोलीतील (Bicholim) पत्रकारांच्या एका तुकडीने शुक्रवारी खानयाळे परिसराला भेट दिली. त्यावेळी या परिसरात मोठ्या प्रमाणात काळ्या दगडांचे उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले. तसेच धरणात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून काही भाग बुजवून टाकल्याचे दिसून येते.

तिळारी धरण परिसरात डोंगर फोडून काळ्या दगडांचे उत्खनन केले जात आहे. डोंगर फोडण्यासाठी जिलेटिनचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. स्फोटकांच्या प्रचंड आवाजाने परिसर हादरून जात आहे. यामुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे धरणाला तडे जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती लक्ष्मण गावडे, संकेत शेट आणि इतर ग्रामस्थांनी दिली.

तिळारी धरण आधीच कमकुवत आहे, अशा स्थितीत धरण परिसरात होणाऱ्या जिलेटिन स्फोटांमुळे हे धरण आणखी कमकुवत होईल व याचा परिणाम दोडामार्ग तालुक्यासह गोव्यालाही भोगावा लागू शकतो. हे धरण फुटल्यास गावचे गाव उद्ध्वस्त होतील. गोवा सरकारने विशेष करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) आणि जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी साळ येथील रहिवासी मेघ:श्याम राऊत यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT