Tilari Canal  Dainik Gomantak
गोवा

Tillari Canal: गोव्याला पाणीपुरवठा करणारा तिलारी कालवा 22 वर्षांनंतर पहिल्यांदाच होणार बंद, कारण काय?

तिलारी कालव्याच्या दुरूस्तीचे काम महाराष्ट्र सरकारच्या वतीने केले जाणार आहे.

Pramod Yadav

गोव्याला पाणीपुरवठा होणारा तिलारी कालवा (Tillari Canal) तब्बल 22 वर्षांनंतर पहिल्यांदाच बंद होणार आहे. मागील 22 वर्षात डागडुजी न झाल्याने डावा आणि उजवा कालवा तब्बल दोन महिन्यांसाठी बंद ठेवला जाणार आहे. मात्र, याचा पिण्याच्या पाण्यावर परिणाम होणार नाही. पाण्याची पर्यायी व्‍यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती गोवा जलसंपदा विभागाने (Goa WRD) दिली आहे.

दरम्यान, तिलारी कालव्यातून शेतीसाठी होणारा पाणी पुरवठा डिसेंबरनंतर सुरू होणार आहे. तसेच पेडणे, डिचोली आणि बार्देश (Pernem, Bicholim and Bardez) तालुक्यातील पाणी पुरवठ्यावर देखील काही परिणाम होणार नाही. अशी माहिती देखील जलसंपदा विभागाने (Goa WRD) दिली आहे. बार्देश तालुक्यासाठी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई होणार नाही यासाठी खाते काळजी घेत आहे. तसेच पेडणे तालुक्यात पाणी चांदेल येथून घेतले जाणार आहे.

तिलारी कालव्याच्या दुरूस्तीचे काम महाराष्ट्र सरकारच्या वतीने केले जाणार आहे. तिलारी धरण महाराष्ट्रात असल्याने कालव्याच्या कामाचा खर्च महाराष्ट्र करणार आहे. कालव्याच्या डागडुजीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यासाठी 45 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

दरम्यान, तिलारी कालव्यातून गोव्याला पाणी पुरवठा होतो मात्र, महाराष्ट्र सरकाने कालव्याच्या दुरूस्तीकडे दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र सरकारने वेळेत डागडुजी न केल्याचे स्थानिक म्हणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT