Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City : 'पणजीतील स्मार्ट सिटीचे काम पूर्ण होईपर्यंत लोकांनी...बाबूश मोन्सेरात यांचे वक्तव्य

पणजीतील रस्त्यांचे खोदकाम हे शहर स्मार्ट बनविण्यासाठी केले जात आहे. खोदकामामुळे लोकांची गैरसोय झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Panjim Smart City: पणजीतील रस्त्यांचे खोदकाम हे शहर स्मार्ट बनविण्यासाठी केले जात आहे. खोदकामामुळे लोकांची गैरसोय झाली असून याची जाणीव आहे.

त्यासाठी आता काम पूर्ण होईपर्यंत लोकांनी थोडा संयम बाळगावा; कारण याचा फायदा त्यांनाच होणार आहे.

तसेच काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदत आहे, असे विधान महसूलमंत्री आंतानासियो ऊर्फ बाबूश मोन्सेरात यांनी केले. पर्वरी येथील मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

पणजीत विविध ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम सुरू असून ते ठरलेल्या वेळेत पु्र्ण केले जाईल की नाही याची खात्री केली जात आहे. पावसाळ्यात लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या बालभवन ते काकुलो मॉल येथील रस्ता पूर्ण झाला आहे.

रस्त्यांच्यासंदर्भात आमच्याकडून काळजी घेतली जात आहे. डांबरीकरण झाल्यानंतर काम पूर्ण होईल. तर सांतिनेज येथे झालेल्या अपघातात ट्रकचालकाची चूक होती. काम सुरू असताना ट्रक खड्ड्याजवळ आल्यामुळे अपघात झाला.

अपघातात जखमी झालेल्या मजुरांना सरकारकडून काही भरपाई मिळणार नाही, त्यांना कंत्राटदाराकडून ती दिली जाईल, असे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

मामलेदारांना मिळणार अधिकार

आगामी विधानसभा अधिवेशनात खाजन जमिनीसंबंधित कायद्यात दुरुस्ती केली जाईल. दुरुस्तीद्वारे मामलेदारांना खाजन शेती आणि मानस नियामक करण्याचे अधिकार मिळणार आहेत.

मानस नियामक करणारी टेनेंट संघटना आपले काम योग्यरीत्या करत नसल्याने ही दुरुस्ती करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली.

बायंगिणीतच कचरा व्यवस्थापन प्रकल्प!

कुंभारजुवे मतदारसंघातील बायंगिणी येथे प्रस्तावित कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला स्थानिकांकडून तसेच कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्याकडूनदेखील विरोध होत आहे.

परंतु कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध करणारे न्यायालयात गेले होते, तेव्हासुद्धा न्यायालयाने प्रकल्पाच्या विरोधात काही टिप्पणी केली नव्हती. त्यामुळे प्रकल्प तेथेच येणार आहे, असे बाबूश मोन्सोरात यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

SCROLL FOR NEXT