तिळारी कालव्याचे (Tilari Canal) दुरुस्तीकाम गेल्या दोन दिवसांपासून बंदच  Dainik Gomantak
गोवा

'तिळारी'चे दुरुस्तीकाम दुसऱ्या दिवशीही बंद

राज्यातील पाणी पुरवठ्यावर परिणामाची शक्यता, पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत दोडामार्गमधील (Dodamarg) सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गुरुवारी कालव्याचे दुरुस्तीकाम बंद पाडले आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रोखलेले मणेरी-दोडामार्ग (Maneri-Dodamarg) येथील तिळारी कालव्याचे (Tilari Canal) दुरुस्तीकाम गेल्या दोन दिवसांपासून बंदच आहे. एकंदरीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सध्याचा पवित्रा पाहता, हे काम आणखी काही दिवस तरी रेंगाळण्याचे संकेत मिळत आहे. यामुळे गोव्यातील (Goa) पाणी पुरवठाही लांबणीवर पडून पाण्यासाठी मारामारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या ता. 10 रोजी पहाटे धनगरवाडी-मणेरी (दोडामार्ग) येथे तिळारीच्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. सुरवातीस पावसाच्या व्यत्ययानंतर गेल्या आठवड्यापासून कालव्याचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे.

दुरुस्तीकाम बंद

पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत दोडामार्गमधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गुरुवारी कालव्याचे दुरुस्तीकाम बंद पाडले आहे. तत्पूर्वी दोडामार्ग येथील तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या संयुक्त बैठकीत स्थानिक अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती मिळाली आहे. जोपर्यंत पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी दोडामार्ग येथे येऊन परिस्थिती जाणून घेत नाहीत. तोपर्यंत दुरुस्तीकाम करू देणार नाही. असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

पाणी पुरवठ्यावर परिणाम

कालव्याला भगदाड पडल्यापासून तिळारीतून गोव्यात होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. उत्तर गोव्याची तहान भागवणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातही सध्या कच्च्या पाण्याचा तुडवडा असल्याची माहिती मिळाली आहे. आमठाणे धरणातील जलसाठाही 7 मीटरनी घटला आहे. तिळारीतून शक्य तितक्या लवकर गोव्यात पूर्ववत पाणी पुरवठा सुरु झाला नाही, तर पाण्यासाठी मारामारी होण्याची भीती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

SCROLL FOR NEXT