Tilari Canal |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa: गोवा अन् महाराष्ट्र दोन्ही राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी कालव्याला मोठे भगदाड

Goa: तिळारी हा गोवा आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: कालव्याला घोडगेवाडी भटवाडी येथे मोठे भगदाड पडले. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. घटना घडून पाच तास उलटले तरी पाणीपुरवठा बंद केला नव्हता. तिळारी हा गोवा आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे.

या पाण्याचा गोव्यात मोठ्या प्रमाणात वापर होतो. गेली काही वर्षे या धरणाचे कालवे नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत.

निकृष्ट कामाचे आरोपही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज धरणाच्या उजव्या कालव्याला घोडगेवाडी भटवाडी येथे मोठे भगदाड पडले व लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी स्थानिक नागरिकांनी याबाबत संपर्क केला असता त्यांच्याकडून समर्पक उत्तरे मिळाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या विभागातील अधिकारी एक दुसऱ्यांकडे बोट दाखवत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT